राष्ट्रीय जनता दल
लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल RJD हा देशातील प्रमुख प्रादेशिक पक्षांपैकी एक आहे. 5 जुलै 1997 रोजी स्थापन झालेल्या या पक्षाने बिहारमध्ये तीनदा सरकार स्थापन केले आहे. 2008 मध्ये आरजेडी राष्ट्रीय पक्ष बनला, परंतु 2010 मध्ये हा दर्जा गमावला. सध्या आरजेडी चा लोकसभेत एकही खासदार नाही तर राज्यसभेत त्यांचे 6 खासदार आहेत. बिहार विधानसभेत सध्या पक्षाचे 75 आमदार आहेत. लालू यादव हे बिहारचे मुख्यमंत्री आणि केंद्रात रेल्वेमंत्रीही राहिले आहेत. त्यांची पत्नी राबडी देवीही तीन वेळा बिहारच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत. सध्या त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव, धाकटा मुलगा तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती हे देखील राजकारणात सक्रिय आहेत.
परिणाम
- पार्टीपरिणाममत %
भाजपा2347
शिवसेना1837
इतर714
- महिला मतदार42,249,192
- पुरुष मतदार46,425,348
- एकूण मतदार88,674,540







