बिजू जनता दल
नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखाली जवळपास दोन दशकांपासून ओडिशात सत्तेत असलेल्या बिजू जनता दलाची बीजेडी स्थापना 26 डिसेंबर 1997 रोजी झाली. पक्षाचे नाव ओडिशाचे प्रमुख नेते आणि नवीन पटनायक यांचे वडील बिजू पटनायक यांच्या नावावरून ठेवण्यात आले. 1998 च्या लोकसभा निवडणुकीत बीजेडीला 9 जागा मिळाल्या होत्या आणि केंद्रात स्थापन झालेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांना खाणकाम मंत्री करण्यात आले. त्यानंतर, 1999 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला 10 जागा मिळाल्या आणि राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाले. त्यांनी या निवडणुका भाजपसोबत लढल्या होत्या. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर नवीन पटनायक यांनी वाजपेयी सरकारचा राजीनामा दिला आणि ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. सध्या पक्षाचे लोकसभेत 20 सदस्य आहेत. नवीन पटनायक हे गेल्या 23 वर्षांपासून ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत.
परिणाम
- पार्टीपरिणाममत %
भाजपा2347
शिवसेना1837
इतर714
- महिला मतदार42,249,192
- पुरुष मतदार46,425,348
- एकूण मतदार88,674,540







