जेएनएन, नवी दिल्ली. Delhi Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले आहे. भाजपानं बहुमताचा आकडा एक हाती गाठला आहे. भाजपाला दिल्लीत 48 जागांवर विजय मिळाला आहे. तर आपला 22 जागा मिळाल्या आहेत. या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा मुख्यालयात विजयोत्सव कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि या विजया बद्दल शुभेच्छा दिला. तसंच दिल्लीकरांचे त्यांनी आभार मानले.

दिल्लीकरांचे मानले आभार

मी दिल्लीला विकसित भारताची विकसित राजधानी करण्याचा एक मोका द्या असं म्हटलं होतं. त्यांनी ती संधी दिली याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. दिल्लींनी आमच्यावर प्रेम दाखवलं आहे, आम्ही दिल्लीचा विकास करुन त्यांचं प्रेम परत करु, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे. तसंच, सबका साथ, सबका विकास, संपूर्ण दिल्लीचा विकास असं म्हणत पंतप्रधानांनी दिल्लीच्या विकासाची गॅरंटी दिली.

भाजपानं महिलांना दिलेली गॅरंटी पूर्ण केली जाईल

तसंच, मोदी यावेळी म्हणाले की, विधानसभाच्या संकल्प पत्रात भाजपानं महिलांना दिलेली गॅरंटी पूर्ण केली जाईल, असा शब्द पंतप्रधानांनी दिला आहे.  

दिल्ली मिनी हिंदूस्तान,

    दिल्ली मिनी हिंदूस्तान, लहू भारत आहे. दिल्ली एक भारत विचारानं जीवन जगते, दिल्ली सर्व भागातील लोक राहतात, दिल्लीत विविधतेनं भरलेली आहे. दिल्लीत याच भागानं भाजपालं मोठा प्रतिसाद दिला आहे. दिल्लीत यांनीच भाजपाचं कमळ खिळवलं आहे, असं मोदी म्हणाले.

    दिल्ली आता 'आप-दा'पासून मुक्त

    "दिल्लीतील लोक आज आनंदी आहेत. दिल्ली आता 'आप-दा'पासून मुक्त झाल्यामुळे त्यांनाही दिलासा मिळाला आहे. मी दिल्लीकरांना एक पत्र पाठवले होते, ज्यामध्ये मी त्यांना 21 व्या शतकात भाजपला त्यांची सेवा करण्याची आणि दिल्लीला भारताची 'विकसित'  राजधानी बनवण्याची विनंती केली होती." असं मोदी म्हणाले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजप मुख्यालयात पोहोचले होते. त्यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, अमित शाह त्यांच्यासोबत होते.

    शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले

    महाराष्ट्रात दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात संकट येत होत, मात्र, आमचं सरकार आल्यावर तिथं जलयुक्त शिवार सारख्या योजना आणल्या आणि शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले. महाराष्ट्रात आता सुशासन आहे.

    अण्णा हजारे आपदा पासून मुक्त झाले

    मी अण्णा हजारे यांची माध्यमांवर प्रतिक्रिया ऐकली. अण्णा हजारे हे खूप दिवसांपासून आपदा वाल्यांच्या कुकृत्याचा त्रास सहन करत होते. आज तेही या आपदा पासून मुक्त झाले आहेत, असं मोदी म्हणाले.

    सीएजीचा अहवाल पहिल्या विधानसभा सत्रात मांडणार

    पहिल्या विधानसभा सत्रात सीएजीचा अहवाल हा ठेवला जाईल. आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांना ते परत करावं लागेल, ही मोदी यांची गॅरंटी आहे, असा इशारा मोदी यांनी दिला आहे.

    राजकारणात नवीन 1 लाख तरुणांना आणायचे

    विकसीत भारत बनवण्यासाठी आपल्याला राजकारणात नवीन 1 लाख तरुणांना आणायचे आहे. विकसीत भारताता प्रत्येक क्षेत्रात नवीकरण झाले पाहिजे.