जेएनएन, दिल्ली. LIVE Delhi Assembly Election Result 2025 Updates: दिल्लीतील सर्व 70 विधानसभा जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. दिल्लीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.78 टक्के मतदान झाले होते. दिल्लीतील सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदार पार पडले असून, आज या निवडणुकांचा निकाल घोषित केला जाणार आहे. दिल्लीतील 19 ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 70 स्ट्राँग रूम बनवण्यात आल्या आहेत.
मतमोजणी प्रक्रियेसाठी मतमोजणी निरीक्षक, मोजणी सहाय्यक, सूक्ष्म निरीक्षक, सांख्यिकी कर्मचारी आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांसह सुमारे 5 हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 5 VVPAT च्या व्होटर स्लिपची मोजणी यादृच्छिकपणे केली जाईल. आजच्या या निकाला संबंधित प्रत्येक अपडेट तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून मिळणार आहे.
- 2025-02-08 18:59:48
Narendra Modi: दिल्ली मिनी हिंदूस्तान
दिल्ली मिनी हिंदूस्तान, दिल्ली एक भारत विचारानं जीवन जगते, दिल्लीत सर्व भागातील लोक राहतात, दिल्ली विविधतेनं भरलेली आहे. दिल्लीत याच भागानं भाजपाला मोठा प्रतिसाद दिला आहे. दिल्लीत यांनीच भाजपाचं कमळ खिळवलं आहे, असं मोदी म्हणाले. तसंच, सबका साथ, सबका विकास, संपूर्ण दिल्लीचा विकास असं म्हणत पंतप्रधानांनी दिल्लीच्या विकासाची गॅरंटी दिली. - 2025-02-08 18:52:39
दिल्ली आता 'आप-दा'पासून मुक्त झाली - मोदी
"दिल्लीतील लोक आज आनंदी आहेत. दिल्ली आता 'आप-दा'पासून मुक्त झाल्यामुळे त्यांनाही दिलासा मिळाला आहे. मी दिल्लीकरांना एक पत्र पाठवले होते, ज्यामध्ये मी त्यांना 21 व्या शतकात भाजपला त्यांची सेवा करण्याची आणि दिल्लीला भारताची 'विकसित' राजधानी बनवण्याची विनंती केली होती." असं मोदी म्हणाले.https://twitter.com/PTI_News/status/1888216281264136666
- 2025-02-08 18:50:23
PM Narendra Modi: आम्ही दिल्लीचा विकास करुन त्यांचं प्रेम परत करु
मी दिल्लीला विकसित भारताची विकसित राजधानी करण्याचा एक मोका द्या असं म्हटलं होतं. त्यांनी ती संधी दिली याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. दिल्लींनी आमच्यावर प्रेम दाखवलं आहे, आम्ही दिल्लीचा विकास करुन त्यांचं प्रेम परत करु, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे. - 2025-02-08 18:46:14
Delhi Elections 2025: 'दिल्लीच्या हृदयात नरेंद्र मोदी'
दिल्ली विधानसभातील विजयानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केलं आहे. तसंच, मुख्यालयातील कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की,'लोकसभेत, दिल्लीच्या लोकांनी भाजपला सर्व 7 जागा जिंकवल्या आणि या विधानसभा निवडणुकीत तुम्ही आम्हाला 48 जागा जिंकवल्या, यावरुन हे स्पष्ट होते की, दिल्लीच्या हृदयात नरेंद्र मोदी आहेत.'https://twitter.com/ANI/status/1888213550365352373
- 2025-02-08 18:33:34
नरेंद्र मोदी यांचं जोरदार स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाजप मुख्यालयात जोरदार स्वागत करण्यात आलं.https://twitter.com/ANI/status/1888209805594222759
- 2025-02-08 18:25:49
PM Narendra Modi : मोदी भाजप मुख्यालयात पोहोचले
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजप मुख्यालयात पोहोचले आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांचे स्वागत केले.https://twitter.com/ANI/status/1888209415733744125
- 2025-02-08 18:00:45
BJP Win Delhi Assembly Election: भाजपाने 44 जागांवर मिळवला विजय
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने 44 जागांवर विजय मिळवला आहे. तर 4 जागांवर आघाडी घेतलेली आहे. तर, आप पक्षाला 21 जागा मिळाल्या असून आप सध्या एका जागेवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा सुफडा साफ झाला आहे. - 2025-02-08 15:11:18
Modi on Delhi Election: मोदींनी दिल्या दिल्लीकरांना शुभेच्छा
मोदींनी दिल्या दिल्लीकरांना शुभेच्छा!https://twitter.com/narendramodi/status/1888150404288098674
- 2025-02-08 14:01:08
केजरीवाल आणि सिसोदिया पराभूत तर अतिशी विजयी!
- कालकाजी मतदारसंघातून आतिशी यांनी विजय मिळवला आहे. या ठिकाणी भाजपच्या रमेश बिधूड़ी यांना पराभवाचा सामना करावा लागला.
- नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल पराभूत
- जंगपूरा मतदारसंघात मनीष सिसोदिया 675 मतांनी पराभूत
- 2025-02-08 12:20:01
Delhi BJP CM Candidate 2025: भाजपकडून कोण होणार दिल्लीचा मुख्यमंत्री?
BJP CM उमेदवार: मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ही नावे आघाडीवर- विजेंद्र गुप्ता (विधानसभा विरोधी पक्षनेते, रोहिणी मतदारसंघ)
- रेखा गुप्ता (शालीमार बाग मतदारसंघ)
- दुष्यंत गौतम (राष्ट्रीय महामंत्री आणि अनुसूचित जातीतील मोठे नेते, करोलबाग मतदारसंघ)
- वीरेंद्र सचदेवा (दिल्ली प्रदेश भाजप अध्यक्ष)
- प्रवेश वर्मा (माजी खासदार आणि नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवार)
- मनोज तिवारी (सध्याचे खासदार आणि भाजपचे मोठे पूर्वांचली चेहरा)
- आशीष सूद (जनकपुरी मतदारसंघ)
- 2025-02-08 11:43:55
Delhi Election LIVE: केजरीवालला दारू घोटाळ्याने बुडवले- अण्णा हजारे
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे कल समोर आल्यानंतर समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले, "केजरीवालला दारू घोटाळ्याने बुडवले." - 2025-02-08 11:24:59
Delhi Election Result 2025: भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, पक्षाने कायम राखली आघाडी
दिल्लीतील 70 पैकी 42 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप आघाडीवर असून, समर्थकांनी सुरू केला जल्लोष.
https://twitter.com/ANI/status/1888086796162208016
- 2025-02-08 11:06:57
Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल पिछाडीवर
नवी दिल्ली विधानसभा क्षेत्राच्या 6 राऊडंची मतमोजणी निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे. त्यानुसार अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे 225 मतांनी पिछाडीवर आहेत. तर भाजपाचे उमेदवार प्रवेश साहिब सिंग वर्मा (PARVESH SAHIB SINGH) यांना 12388 मते पडली आहेत. तर काँग्रेस उमेदवार संदीप दीक्षित यांना 1684 मते मिळाली आहेत. सविस्तर वाचा - New Delhi Assembly Election Result 2025: भाजपा उमेदवाराने दिली अरविंद केजरीवालांना धोबी पछाड - 2025-02-08 10:39:48
Omar Abdullah On Delhi Result: 'समाप्त कर दो एक दूसरे को': ओमर अब्दुल्लांचा INDIA आघाडीवर टोला
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काँग्रेस आणि आप यांना टोला लगावत, दिल्ली विधानसभा निवडणूक निकालांमध्ये भाजपच्या मजबूत आघाडीवर प्रतिक्रिया दिली.https://twitter.com/OmarAbdullah/status/1888071546344034707
- 2025-02-08 10:24:15
Delhi Election Update: अरविंद केजरीवाल 6,442 मतांनी आघाडीवर
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून 6,442 मतांनी आघाडीवर आहेत. भाजप उमेदवार प्रवेश साहिब सिंग यांच्यापेक्षा ते 343 मतांनी पुढे आहेत, ज्यांना 6,099 मते मिळाली आहेत. भारतीय निवडणूक आयोगानुसार, या मतदारसंघात 56.41 टक्के मतदान झाले आहे. या महत्त्वाच्या जागेचा निकाल मतमोजणी पूर्ण होताच स्पष्ट होईल.
- 2025-02-08 10:08:44
Delhi Election Result 2025: भाजप 39 जागांवर तर आप 23 जागांवर - EC
भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, भाजप 39 जागांवर आघाडीवर असून, आम आदमी पक्ष (AAP) 23 जागांवर पुढे आहे. - 2025-02-08 09:55:30
Delhi Election Result 2025 Live: अरविंद केजरीवाल न्यू दिल्ली मतदारसंघात आघाडीवर
AAP प्रमुख अरविंद केजरीवाल भाजपच्या प्रवेश वर्मा यांच्याविरुद्ध अवघ्या 254 मतांच्या कमी फरकाने आघाडीवर आहेत. - 2025-02-08 09:24:00
Delhi Assembly Election Result LIVE: मनीष सिसोदिया आघाडीवर
जंगपूरा मतदार संघातून मनीष सिसोदिया आघाडीवर आहेत. तर दिल्लीतील 35 जागांवर आप आणि 34 जागांवर भाजप आघाडीवर आहे. - 2025-02-08 09:10:00
Delhi Election Result Live: ईव्हीएमच्या पहिल्या फेरीत बिधुरी 673 मतांनी आघाडीवर
कालकाजी मतदार संघातील भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी पहिल्या फेरीत त्यांचे प्रतिस्पर्धी आप उमेदवार आतिशी यांच्या विरुद्ध 673 मतांनी आघाडीवर आहेत तर अतिशय या पिछाडीवर आहेत. - 2025-02-08 08:52:49
Delhi Polls Result: मतमोजणी केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली
दिल्ली पोलिसांनी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. योग्य प्रमाणात पोलिस दल तैनात करण्यात आले असून, ड्रोनचा देखील वापर केला जात आहे. दक्षिण विभागाचे संयुक्त पोलिस आयुक्त संजय कुमार जैन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मतमोजणी केंद्रावर चार-स्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. - 2025-02-08 08:30:25
Delhi Election Result 2025 Live: अरविंद केजरीवाल, आतिशी आणि मनीष सिसोदिया पिछाडीवर
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्राथमिक कलांमध्ये आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. नवी दिल्ली मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पिछाडीवर आहेत, तर भाजपचे प्रवेश वर्मा आघाडीवर आहेत. तसेच, आतिशी आणि मनीष सिसोदिया देखील त्यांच्या मतदारसंघात मागे आहेत, असे आज तकच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
- 2025-02-08 08:25:37
New Delhi Assembly Election Result 2025 Live: तरुण AAP समर्थक अरविंद केजरीवाल यांच्या रूपात Watch Video
AAP राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा एक तरुण समर्थक, अव्यान तोमर, त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी अरविंद केजरीवाल यांच्या वेशात पोहोचला.https://twitter.com/ANI/status/1888050689844387862
- 2025-02-08 08:16:20
Delhi Election Result Live: प्रवेश वर्मा म्हणाले - दिल्लीत भाजपची सत्ता येणार
दिल्लीतील सर्वात व्हीआयपी नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी म्हटले की, आज दिल्लीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. त्यांनी दावा केला की दिल्लीत भाजपची सरकार बनेल.
- 2025-02-08 08:05:35
Delhi Election result: सर्व तयारी पूर्ण, मतमोजणीला सुरुवात
पूर्व दिल्लीतील नंद नगरी येथे मतमोजणी केंद्राच्या बाहेर पोलिस तैनात आहेत. मतमोजणी केंद्रावर मीडिया सेंटर तयार करण्यात आले आहे. - 2025-02-08 07:46:30
Delhi Vidhan Sabha NIvadnuk Result: या प्रमुख उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला!
दिल्ली विधानसभा निवडणुकीत या प्रमुख उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला
- अरविंद केजरीवाल
- प्रवेश वर्मा
- संदीप दीक्षित
- मनीष सिसोदिया
- आतिशी
- रमेश विधूडी
- विजेंद्र गुप्ता
- देवेंद्र यादव
- गोपाल राय
- 2025-02-08 07:30:57
Delhi Vidhan Sabha Election Result 2025: केजरीवाल बनतील चौथ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री
"ज्याला जनता पाठिंबा देते, तोच निवडणूक जिंकतो. अरविंद केजरीवाल सरकारने गेल्या 10 वर्षांत लोकांची सेवा केली आहे... अरविंद केजरीवाल चौथ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री बनतील," असे आपचे सौरभ भारद्वाज म्हणाले.https://twitter.com/PTI_News/status/1888037743323922784
- 2025-02-08 07:15:00
Kalkaji Assembly Election 2025 Results: भाजप उमेदवार शिखा राय यांनी कालकाजी मंदिरात प्रार्थना केली
ग्रेटर कैलाश विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार शिखा राय यांनी दिल्ली निवडणुकीच्या निकालापूर्वी आज सकाळी कालकाजी मंदिरात प्रार्थना केली. - 2025-02-08 07:00:00
Delhi Assembly Election Result 2025 Liveदिल्लीतील 11 जिल्ह्यांमध्ये एकूण 19 मतमोजणी केंद्रे
दिल्लीतील 70 विधानसभा मतदार संघासाठी घेण्यात आलेल्या निडणुकांच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरवात होणार आहे. - 2025-02-08 06:45:00
Delhi Election 2025 Results Live: भ्रष्टाचाराचे आरोप आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा
अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यांनतर त्यांनी राजीनामा दिला व आपच्या अतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. - 2025-02-08 06:30:00
Delhi Election 2025 Results Live: दिल्लीत सध्या आपची सत्ता असून, अतिशी मुख्यमंत्री आहेत
या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत आहे. जंगपूरा, कालकाजी आणि नवी दिल्ली या मतदार संघांकडे जनतेचे लक्ष लागले आहे. - 2025-02-08 06:14:23
Delhi Election Result 2025: नवी दिल्ली मध्ये अरविंद केजरीवाल आणि प्रवेश वर्मा आमने सामने!
नवी दिल्ली मतदार संघातून आम आदमी पक्षाचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच भाजपचे प्रवेश साहिब सिंग वर्मा तर काँग्रेसच्या वतीने संदीप दीक्षित निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे - 2025-02-08 06:00:00
दिल्ली विधानसभेचा लाईव्ह निकाल
Delhi Election Result 2025 Live: राजधानी दिल्लीत 2013 पासून आपची सत्ता आहे. अरविंद केजरीवाल यांनी तीनवेळा दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.