जेएनएन, नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने 45 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे. तर आप पक्षाला केवळ 21 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचा सुफडा साफ झाला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयासाठी सर्व भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन भाजपा नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.  तसंच, फेक नरेटीव्ह चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेनं दाखवून दिलं आहे, असं फडणवीस म्हणाले.

खोट राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या नागरिकांनी दाखवून दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा नवी उंची गाठत आहे. दिल्लीच्या जनतेचा हा जनादेश 'आप' आणि त्यांच्या नेत्यांकडून होणाऱ्या भ्रष्टाचार, कुशासन आणि लूटमारीविरुद्ध आहे. दिल्लीच्या जनतेच्या कल्याणासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमांमुळे या प्रचंड यशामागे आहेत, असं फडणवीस आहे.

दिल्लीचा मराठी माणूस हा नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे उभा राहिला याचा मला अभिमान आहे. दिल्लीत माझ्या प्रचाराचा परिणाम वगेरे काही नाही, तेथील जनता हुशार आहे, असं फडणवीस म्हणाले.

भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल आणि विकासाचा मार्ग निवडल्याबद्दल मी दिल्लीच्या जनतेचे देखील अभिनंदन करतो, असंही फडणवीस म्हणाले.

    मी कालच सांगितलं होतं की, राहुल गांधी हे त्यांच्या पराभवाची तयारी करत आहेत. ते कव्हर फायरींग करत आहेत, त्यांना त्यांचा पराभव दिसत आहे. आज ते खरं झालं आहे, असं फडणवीस म्हणाले.