जेएनएन, नाशिक. Apmc Lasalgaon Onion Price: लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी 11,068 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज लासलगांव बाजार समितीचे दुपार पर्यंत ( पहिल्या सत्रात ) झालेले कांदा लिलाव 523 नग आहे. आज कांद्याला लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत (Lasalgaon Agricultural Produce Market Committee) सर्वसाधारण 1650 रुपये भाव मिळत आहे. जो मागील काही दिवसांत मिळालेला भावाच्या 440 रुपये प्रतिक्विंटल जास्त आहे. 

उन्हाळ कांद्याला किमान 700 रुपये तर कमाल 1816 रुपये भाव मिळाला असून सर्वसाधारण उन्हाळ कांद्याची खरेदी 1650 रुपये भावाने झाली आहे. 

आजचे कांद्याचे दर (Today's Onion Price)

बाजार समितीने दिलेल्या माहितीच्या आधारे...

उन्हाळ कांदा बाजारभाव   

कमीत कमी  - 700       

    जास्तीत जास्त-1816       

    सर्व साधारण -  1650 

    सोयाबीन भाव - 233 क्विंटल आवक

    कमीत कमी  - 4000  

    जास्तीत जास्त- 4930   

    सर्व साधारण -  4871  

    शेतकऱ्यांचा फायदा

    लासलगांव बाजार समितीत झालेले कांदा लिलाव 683 नग आहे. उन्हाळ कांद्याला लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत सर्वसाधारण 1280 रुपये भाव (Lasalgaon Onion Market Price) मिळाला आहे. मागील काही दिवसांपूर्वी कांद्याचा भाव हा 1650 रुपयांवर गेला होता. मागील काही दिवसांपासून यात सातत्याने मोठी वाढ होत आहे. कांदाचा भाव वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.  

    काल कांदा व अन्य अन्न धान्यांना मिळालेले भाव

    शुक्रवारी मार्केट बंद

    शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन असल्याने लासलगाव मुख्य मार्केट यार्ड वरील कांदा, भुसार व तेलबिया या शेतीमालाचे लिलाव बंद राहतील. तसेच टोमॅटो व भाजीपाला लिलाव सुरू राहतील याची सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांनी नोंद घ्यावी.

    पीककिमानकमालसरासरी
    उन्हाळ कांदा70018161650