जेएनएन, मुंबई: राज्यातील महिलांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी शासनाकडून लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना 1500 रुपये प्रति महिना देण्यात येत आहेत. या योजनेच्या निकषानुसार कुटुंबातील एका दोन महिलांना पैसे दिले जातात. या निकषावरुन मागील काही दिवसांपासून वगळण्यात येत असलेल्या नावांवरुन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
सुळे यांची सरकारवर टीका
सरकार हसत्या-खेळत्या घरांमध्ये सासू-सुना, जावा-जावा, ननंद-जाऊ यांच्यात भांडणे लावण्याचे काम करत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. त्यांनी समाज माध्यमांवर एक ट्वीट केले आहे. यामध्ये त्या
अनेक घरांची शांतता बिघडली
“शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे निकष पावसाबाबत लोकांचे अंदाज बदलावे त्याप्रमाणे बदलत आहेत. पण त्यामुळे चांगल्या हसत्या-खेळत्या घरांमध्ये सासू-सुना, जावा-जावा, ननंद-जाऊ यांच्यात भांडणं लागली आहेत. ही भांडणं आजकाल विकोपाला जाऊ लागली आहेत. यामुळे अनेक घरांची शांतता बिघडली आहे. शासनाने अक्षरशः घराघरात भांडणं लावली असं म्हणता येईल.” असं म्हणतं आहेत.
सरसकट पात्र महिलांना या योजनेचा लाभ द्यावा
तसंच, “आता शासनानेच ही भांडणं सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि सरसकट पात्र महिलांना या योजनेचा लाभ द्यावा,” अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे निकष पावसाबाबत लोकांचे अंदाज बदलावे त्याप्रमाणे बदलत आहेत. पण त्यामुळे चांगल्या हसत्या-खेळत्या घरांमध्ये सासू-सुना, जावा-जावा, ननंद-जाऊ यांच्यात भांडणं लागली आहेत. ही भांडणं आजकाल विकोपाला जाऊ लागली आहेत. यामुळे अनेक घरांची शांतता बिघडली आहे. शासनाने…
— Supriya Sule (@supriya_sule) August 13, 2025
लाडकी बहिण योजनेचे निकष (Ladki Bahin Scheme Criteria)
- लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयातीत असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे.
- दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करणे अनिवार्य असणार आहे
- ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही योजनेतून बाद केले जाईल.
- अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केले जाईल.
- लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे.
- नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही.
- अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळणार आहे.
- अर्जातील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यामध्ये तफावत आढळल्यास अपात्र केले जाईल.
- नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना 1500 रुपये दिले जाणार नाही.