जेएनएन, मुंबई. FDI In Maharashtra: महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्यात बाजी मारली आहे. देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक (Foreign Direct Investment) ही महाराष्ट्रात आली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीची (जानेवारी ते मार्च 2025) आकडेवारी सुद्धा आता जाहीर झाली. यात महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे.
2024-25 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीची (जानेवारी ते मार्च 2025) आकडेवारी सुद्धा आता जाहीर झाली असून, आता या संपूर्ण वर्षांत मिळून महाराष्ट्राने 1,64,875 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. जी यावर्षी देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीच्या 40 टक्के इतकी आहे. यावर्षी देशात आलेली गुंतवणूक ही 4,21,929 कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात गेल्यावर्षीचा विचार केला तर यावर्षी त्यापेक्षा 31 टक्के गुंतवणूक अधिक आली आहे. या शेवटच्या तिमाहीत 25,441 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत हे वर्ष गेल्या 10 वर्षांतील रेकॉर्ड स्थापित करणारे वर्ष ठरले. अर्थात हा रेकॉर्ड आपण पहिल्या 9 महिन्यातच मोडला होता, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
मी महाराष्ट्रातील जनतेचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड ही अशीच कायम राहील, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मागील काही वर्षात महाराष्ट्रात आलेली परकीय गुंतवणूक
- 2015-16 : 61,482 कोटी
- 2016-17 : 1,31,980 कोटी
- 2017-18 : 86,244 कोटी
- 2018-19 : 57,139 कोटी
- एप्रिल ते ऑक्टोबर 2019 : 25,316 कोटी
- 2020-21 : 1,19,734 कोटी
- 2021-22 : 1,14,964 कोटी
- 2022-23 : 1,18,422 कोटी
- 2023-24 : 1,25,101 कोटी
- 2024-25 : 1,64,875 कोटी
अभिनंदन महाराष्ट्र !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 29, 2025
महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक
2024-25 मध्ये देशाच्या 40 टक्के इतकी,
तर राज्यात गेल्यावर्षीपेक्षा 32 टक्के अधिक!
मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, 2024-25 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीची (जानेवारी ते मार्च 2025) आकडेवारी सुद्धा आता जाहीर झाली… pic.twitter.com/h7GVrYkjR3
हेही वाचा - Lasalgaon Onion Price Today: कांद्याचे भाव वाढले, जाणून घ्या आजचा कांद्याचा भाव