एजन्सी, मुंबई. Rains in Maharashtra: राज्य सरकारच्या अहवालानुसार, गेल्या पाच दिवसांत महाराष्ट्रात भूस्खलन, वीज पडणे, झाड किंवा इमारती कोसळणे यासारख्या पावसाशी संबंधित घटनांमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

अनेक भागात पावसानं थैमान घातलं 

या वर्षी मान्सून राज्यात लवकर दाखल झाला आहे. तेव्हा 24 मे पासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. राज्याच्या अनेक भागात पावसानं थैमान घातलं आहे. अनेक भागात नदी नाल्यांना पूर आल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यातील जवळजवळ सर्वच भागात मुसळधार पावसाचा फटका बसला. 

कुठे किती मृत्यू

पुणे जिल्ह्यात तीन, त्यानंतर ठाणे, लातूर आणि भंडारा येथे प्रत्येकी 2 जणांचा मृत्यू झाला. रायगड, अहिल्यानगर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, मुंबई उपनगर आणि गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला, असे अहवालात म्हटले आहे. 

    41 जनावरांचा मृत्यू

    याशिवाय, 24 मे पासून पावसाशी संबंधित घटनांमध्ये 18 जण जखमी झाले आहेत, असे अहवालात म्हटले आहे. राज्यात अतिवृष्टीच्या घटनांमध्ये 41 जनावरांचा मृत्यू झाल्याचेही अहवालात म्हटले आहे.