राहुल गांधी (Rahul Gandhi) भारतीय राजकारणी असून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. 16 डिसेंबर 2017 ते 3 जुलै 2019 पर्यंत ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्याआधी त्यांनी उपाध्यक्ष व महासचिव म्हणून काम पाहिले होते. राहुल गांधी यांचे शिक्षण हार्वर्ड विद्यापीठात झाले आहे. 2004 मध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून राहुल गांधी यांची सक्रीय राजकारणात एंट्री झाली. सध्या ते रायबरेलीचे खासदार असून लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत.