नवी दिल्ली. Rahul Gandhi Press Conference : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील इंदिरा भवन सभागृहात पुन्हा एकदा मतदानातील गैरप्रकाराचा मुद्दा उपस्थित करत थेट निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राहुल गांधींनी आरोप केला की, कर्नाटक राज्यातील आलंद येथे 6,018 मतदार यादीतून वगळले आहेत तर महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात 6850 मतदारांची नावे गैरमार्गात यादीत घुसडली आहेत.  तर जाणून घेऊया 2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राजुरा मतदारसंघात काय निकाल लागला, कोण विजयी झाले व किती मतांच्या फरकाने उमेदवार पराभूत झाला.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, आलंदमध्ये वगळलेले मतदार आम्ही शोधले आहेत. राजुरामध्ये देखील जोडले गेले, परंतु मूळ कल्पना तीच आहे. तीच व्यवस्था हे करत आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये ते करत आहे आणि आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत. 

राहुल गांधींनी उल्लेख केलेल्या राजुरा मतदारसंघात काय झालं -

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. हा एक संवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राजुरा (चंद्रपूर) मतदारसंघात भाजपचे जिंकला. भाजपचे देवराव विठोबा भोंगळे यांचा 3650 मतांनी विजय झाला. तर काँग्रेसचे जेष्ठ आमदार सुभाष रामचंद्रराव धोटे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. भोंगळे यांना 72,512 मते मिळाली तर काँग्रेसचे धोटे यांना 68,832 मते मिळाली.  तिसऱ्या क्रमांकावर स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव सदाशिव चटप यांना 54,858 मते मिळाली. राजुरा सोबतच राज्यातील अनेक मतदारसंघातील निकाल काही मतांच्या फरकाने अटीतटीचा लागल्याने निवडणूक आयोगाने मतदारांची नावे मतदार यादीतून हटवणे व बनावट नावे घुसडण्याच्या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. येथे भाजपच्या उमेदवाराला एकूण मतदानापैकी 30.53 टक्के मते मिळाली तर त्यांचे निकटतम प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार धोटे यांना 29.25 टक्के मते मिळाली. म्हणजे केवळ 1 टक्क्यांच्या मत फरकाने विजयाचे पारडे भाजपकडे झुकले.

राजुरा मतदारसंघात 3,15,073 इतके नोंदणीकृत मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 1,59,821 तर महिला मतदारांची संख्या 1,55,252 इतकी आहे. 

    राहुल गांधी म्हणाले की, राजुरामध्ये 6,850 टारगेट मतदार जोडण्यात आले असा आरोप करून राहुल गांधी म्हणाले, आलंदमध्ये,  वगळलेले मतदार आम्ही शोधले आहेत. राजुरामध्ये देखील जोडले गेले, परंतु मूळ कल्पना तीच आहे. तीच व्यवस्था हे करत आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये ते करत आहे आणि आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत.