प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) भारतीय राजकारणी असून त्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय महासचिव आहेत. 2024 मध्ये वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक जिंकून त्यांचे लोकसभेत आगमन झाले. सक्रीय राजकारणात येण्यापूर्वी प्रियांका गांधी यांनी रायबरेली व अमेठी मतदारसंघात आई सोनिया गांधी व भाऊ राहुल गांधी यांच्यासाठी प्रचार मोहीम राबवली. प्रियांका गांधी लोकसभेत प्रभावी भाषण करून सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात.