Priyanka Gandhi in parliament session : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेस खासदार प्रियंका गांधी (priyanka gandhi) यांनी लोकसभेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी आरोप केला की, सरकारने 26 निष्पाप लोकांना केवळ देवाच्या भरवशावर सोडले होते.
प्रियांका म्हणाल्या, आपल्या देशातील वाळवंटात, घनदाट जंगलात आणि बर्फाळ पर्वतांमध्ये राहून देशाचे रक्षण करणाऱ्या सर्व सैनिकांना मी सलाम करू इच्छिते..." ते आपल्या देशाचे रक्षण करतात. देशासाठी आपले प्राण देण्यास ते नेहमीच तयार असतात. 1948 पासून आतापर्यंत - जेव्हा पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला होता - तेव्हापासून आपल्या सैनिकांनी आपल्या देशाच्या अखंडतेचे रक्षण करण्यात मोठे योगदान दिले आहे.
काल संरक्षणमंत्र्यांनी 1 तासाचे भाषण दिले ज्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींबद्दल बोलले पण एक गोष्ट राहिली. 22 एप्रिल 2025 रोजी 26 नागरिकांची उघडपणे हत्या झाली तेव्हा हा हल्ला कसा आणि का झाला? हे त्यांनी सांगितले नाही.
'देशातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे?'
काँग्रेस खासदार म्हणाल्या, मला विचारायचे आहे की देशातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे? या देशाच्या पंतप्रधानांकडे ती नाही का? या देशाच्या गृहमंत्र्यांकडे ती नाही का? या देशाच्या संरक्षणमंत्र्यांकडे ती नाही का? तसेच या देशाच्या NSA नाही का?"
पहलगाम हमले में शहीद हुए शुभम द्विवेदी की पत्नी ने कहा-
— Congress (@INCIndia) July 29, 2025
''मैंने अपनी दुनिया को अपनी आंखों के सामने खत्म होते देखा, वहां एक सिक्योरिटी गार्ड नहीं था। मैं ये कह सकती हूं कि सरकार ने हमें वहां अनाथ छोड़ दिया था।''
सवाल है कि वहां सिक्योरिटी क्यों नहीं थी, एक भी जवान क्यों नहीं… pic.twitter.com/4bZAwHFCqM
तुम्ही इतिहासाबद्दल बोला, आम्ही वर्तमानावर बोलणार.
प्रियांका गांधी यांनी प्रश्न विचारला की जेव्हा सरकार दावा करत होते की काश्मीरमध्ये दहशतवाद कसा कमी झाला आहे? सरकारवर हल्लाबोल करताना गांधी म्हणाले की, तुम्ही इतिहासाबद्दल बोलत राहा, आम्ही वर्तमानावर बोलू.
गृहमंत्र्यांनी सांगितले की पाकिस्तानकडे शरण येण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रश्न असा आहे की तुम्ही त्यांना शरण का दिली?
दहशतवादी आपल्या देशात येतात आणि लोकांना मारतात आणि तुम्ही त्यांना आश्रय देत आहात. तुम्ही तुमच्या कोणत्याही भाषणात याचे उत्तर का दिले नाही? सीजफायरचा मुद्दा उपस्थित होताच, गृहमंत्र्यांनी इतिहासात डोकावले. ते नेहरूजी, इंदिराजींपासून माझ्या आईच्या अश्रूंपर्यंत गेले. पण त्यांनी युद्धबंदी का झाली, युद्ध का थांबले या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. माझ्या आईच्या अश्रूंबद्दल बोललं गेलं. माझ्या आईचे अश्रू तेव्हा पडले जेव्हा दहशतवादी हल्ल्यात माझे वडील शहीद झाले. त्यावेळी माझी आई 44 वर्षांची होती. आज मी या सभागृहात त्या 26 कुटुंबांच्या वेदनांबद्दल बोलू शकते कारण त्यांच्या वेदना मी जाणते.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू झाले तेव्हा संपूर्ण देश एक झाला होता. पंतप्रधानांनी श्रेय घेतले पण केवळ श्रेय घेतल्याने जबाबदारी पूर्ण होत नाही.
प्रियांका गांधी म्हणाल्या की, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच युद्ध मध्येच थांबवण्यात आले. आणि ही घोषणा भारतीय सैन्याने किंवा सरकारने केली नाही तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे विभाजन करून हे पाकला गुडघे टेकायला भाग पाडले होते.
काय म्हणाले होते अमित शहा?
अमित शहांनी संसदेत बोलताना सोनिया गांधी यांचा उल्लेख केला होता. त्यांनी म्हटले की, एके दिवशी मी सलमान खुर्शीद यांचे विधान ऐकले की सोनिया गांधी बाटला हाऊस एन्काऊंटरवर रडल्या होत्या. त्यांनी शहीद मोहनलालसाठी रडायला हवे होते. मी उद्या संसदेत सलमान खुर्शीद यांचे विधान दाखवून देईल.