गणेश चतुर्थी

गणेश चतुर्थी
गणेश चतुर्थी
Created By:Shrikant Londhe
यंदा गणेशोत्सव (Ganesh chaturthi 2025)  27 ऑगस्ट गणेश चतुर्थी ते 6 सप्टेंबर अनंतचतुर्थीपर्यंत साजरा केला जाणार आहे. 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्या उत्सवाने आता विराट रुप घेतले आहे. महाराष्ट्रातील गणेशोत्सव खूप प्रसिद्ध आहे. पुण्यातील गणेशोत्सवाला ऐतिहासिक महत्व असून येथे पाच मानाच्या गणपतीसोबत दगडूशेट गणपतीही विशेष प्रसिद्ध आहे. मुंबईतील लालबागचा राजा गणपतीच्या दर्शनाला देश-विदेशातील भाविक येत असतात.