पंढरीची वारी - आषाढी एकादशी 2025: पंढरीची वारी ही केवळ वारकऱ्यांची यात्रा नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. दरवर्षी लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायी येतात. या वारीत संत ज्ञानेश्वर, तुकाराम, गजानन, निवृत्ती महाराजांच्या पालख्या व दिंड्या विठ्ठलनामाचा गजर करत, भजन-कीर्तनात दंग होत चंद्रभागेच्या तीरी विसावतात. दिंड्यांमधील रिंगण सोहळा एक अद्भूत, अविस्मरणीय क्षण असतो. ही वारी भक्ती, श्रद्धा आणि एकतेचे प्रतीक असून महाराष्ट्राचा आत्मा आहे.