मुंबई: Ladki Bahin Yojana Deadline Extension : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवल्याची चर्चा आहे. त्यानुसार, त्यांना आता 31 जानेवारीपर्यंत त्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्याची संधी मिळेल. तथापि, जिल्हा महिला आणि बालविकास कार्यालयाला अद्याप याबद्दल अधिकृत पत्र मिळालेले नाही. यामुळे प्रक्रियेबाबत महिला लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

ई-केवायसीची अंतिम मुदत काय आहे?

महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. ही प्रक्रिया 18 सप्टेंबर रोजी सुरू झाली. सुरुवातीला एक महिना म्हणजेच 18 नोव्हेंबरपर्यंत केवायसीची अंतिम मुदत होती. तथापि, अनेक महिला निर्धारित वेळेत त्यांचे ई-केवायसी पूर्ण करू शकल्या नाहीत. ही बाब लक्षात घेऊन महिला व बालविकास मंत्रालयाने ही अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवली. ही अंतिम मुदत ३१ डिसेंबर रोजी संपत असताना, मोठ्या संख्येने महिलांच्या ई-केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण असल्याचे समोर आले आहे.

लाखो लाभार्थ्यांची ई-केवायसी अपूर्ण- 

लाडकी बहीण योजनेच्या जवळपास अडीच कोटींच्या जवळपास लाभार्थी आहेत. यापैकी आतापर्यंत 1 कोटी 60 लाख महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलीय.अजूनही 30 ते 40 लाख केवायसी झालेली नाही. ग्रामीण भागातील तांत्रिक समस्या, इंटरनेट समस्या, माहितीचा अभाव आणि कागदपत्रांमधील त्रुटींमुळे अनेक लाभार्थी महिला त्यांचे ई-केवायसी पूर्ण करू शकलेल्या नाहीत. यामुळे, पुन्हा एकदा अंतिम मुदत वाढवण्याची चर्चा आहे. त्यानुसार, ई-केवायसी आता 31 जानेवारीपर्यंत करता येईल असे संकेत आहेत. योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि केवळ पात्र लाभार्थ्यांनाच नियमित आर्थिक लाभ मिळावा यासाठी ई-केवायसीची अट घालण्यात आली आहे. तथापि, ई-केवायसीच्या नेमक्या अंतिम तारखेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

वेबसाइटवर लिंक अजूनही उपलब्ध - 

    विशेष म्हणजे ई-केवायसी सुविधा https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, अद्याप अधिकृत आदेश प्राप्त झालेला नसल्याने, जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे, महिला आणि बालविकास विभाग लाभार्थ्यांना अंतिम मुदतीबाबत अधिकृत पत्राची वाट पाहण्याचे आवाहन केले आहे.

    ई-केवायसी न केलेल्या महिलाचं काय होणार -

    योजनेची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर 2025 होती, त्यानंतर योजनेची मुदत वाढवल्याची कोणतीही माहिती समोर न आल्याने ई- केवायसी वेळेत पूर्ण न केलेल्या अंदाज 30 ते 40 लाख महिला आता या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. त्यांची नाव या योजनेच्या यादीमधून वगळण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2025 पर्यंत  राज्यातील 1 कोटी 80 लाख महिलांनीच या योजनेसाठीची केवायसी पूर्ण केली आहे. ज्या महिलांनी ई-केवायसी केली त्यांचे पैसे नियमितपणे सुरू राहणार आहेत.

    मात्र वारंवार सूचना देऊनही तांत्रिक अडचणी किंवा दुर्लक्षामुळे केवायसी न केलेल्या, ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही त्यांना 'अपात्र' ठरवले जाऊ शकते. अशा महिलांना नवीन वर्ष 2026 मध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभाला मुकावे लागू शकते.