स्‍पोर्ट्स डेस्‍क, नवी दिल्ली. India Vs England Test Series 2025: इंग्लंड व भारतादरम्यान खेळल्या जात असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला २२ धावांनी पराभव सहन करावा लागला. भारतीय खेळाडूंनी शेवटपर्यंत झुंज दिल्याने खूपच रोमांचकारी झालेल्या सामन्यात भारताचा झालेला पराभव क्रिकेटप्रेमींच्या मनाला चटका लावणारा आहे.

भारताकडून  रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्‍मद सिराज या तळातील फलंदाजांच्या फळीने कडवा संघर्ष केला मात्र ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय टीमने उपहारापर्यंत 112 धावांवर आठ विकेट गमावल्या होत्या. 

पाहुण्या संघाने पुढच्या सत्रात केवळ एकच विकेट गमावली. जसप्रीत बुमराहने केवळ 5 धावा केल्या मात्र त्यासाठी 54 चेंडू खेळून काढत इंग्लंडच्या गोलंदाजांचा घाम काढला. स्‍टोक्‍सने बुमराहला तंबूत पाठवल्यानंतर सिराजने निकराने लढा देत जडेजाची साथ दिली. दोघे खेळत असताना भारताला विजयाची आशा होती. 

नशीबाची साथ मिळाली नाही -

दोघांची जोडी जमली असतानाच विजयाने भारताला हुसकावणी दिली. 75 व्या षटकात शोएब बशीरच्या गोलंदाजीवर  मोहम्‍मद सिराजचा त्रिफळा उडाला. विचित्र पद्धतीने सिराज बाद झाला. त्याने सुरक्षात्मक पद्धतीने चेंडू खेळून काढला होता, मात्र चेंडूचा क्रीजवर टप्पा पडून मागे गेली व स्‍टंप्‍सवर आदळली. सिराज ज्या पद्धतीने बाद झाला ते पाहून 1999 चेन्‍नई कसोटीच्या आठवणी ताज्या झाल्या. 

1999 मध्ये चेन्‍नई टेस्‍टमध्ये भारताला पाकिस्‍तानकडून 13 धावांनी पराभव सोसावा लागला होता. हा पराभव भारतीय क्रिकेटप्रेमींच्या जिव्हारी लागला होता. ही कसोटी सचिन तेंडुलकरच्या शतकी खेळीसाठी संस्मरणीय ठरली तसेच शेवटची विकेट भारतीय लोक विसरू शकणार नाहीत.

    26 वर्षापूर्वीचा किस्सा -

    तेव्हा श्रीनाथला सकलेन मुश्‍ताकने बाद केले होते. मुश्‍ताकने ‘दूसरा’ चेंडू टाकला, ज्यावर श्रीनाथने बॅकफूट डिफेन्स केला. मात्र चेंडू टप्‍पा खाऊन श्रीनाथच्या पायांच्या मधून स्‍टंप्‍सवर आदळला होता. सिराजही अशाच पद्धतीने बाद झाला. सिराज बाद झाल्यानंतर क्रिकेटप्रेमींना चेन्‍नई टेस्‍टमध्ये जवागल श्रीनाथच्या विकेटची आठवण झाली.

    भारताची मालिकेत पिछाडी -

    मोहम्‍मद सिराजने 30 चेंडूंचा सामना करत 5 धावा केल्या.  टीम इंडिया 170 धावांत ऑलआउट झाली व इंग्लंडने हा सामना 22 धावांनी जिंकला. पहिल्या डावात दोन्ही संघांनी सर्वबाद 387 धावा केल्या होत्या. भारतीय टीम या पराभवामुळे पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर पडली आहे. दोन्ही संघादरम्यान चौथा कसोटी सामना जुलैपासून मॅनचेस्‍टरमध्ये खेळला जाईल.