Ganesh Chaturthi 2025 Quiz : गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी भाद्रपद महिन्यात साजरा केला जातो. यंदा हा उत्सव बुधवार 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. गणेश यश, बुद्धी व ज्ञानाचे प्रतीक आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने, मराठी जागरण आणि जागरण कनेक्ट प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खास प्रश्नमंजुषा स्पर्धा, यामध्ये सहभागी होऊन तुम्ही तुमची बुद्धिमत्ता तपासू शकता व मिळवू शकता विजयी होण्याची संधी अन् खास बक्षीस सुद्धा.

लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून या सणाला सामाजिक एकतेचे आणि जनजागृतीचे प्रतीक बनवले. गणपतीला 'विघ्नहर्ता' आणि 'सुखकर्ता' म्हणून ओळखले जाते. या १० दिवसांच्या उत्सवादरम्यान, भक्त गणपतीची मूर्ती घरात आणून त्याची प्रतिष्ठापना करतात. 

आजही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. उत्सवादरम्यान गणेश पूजा करून 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष केला जातो. गणपतीला आवडणारे पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो. या उत्सवादरम्यान समाजाला एकत्र आणणारे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामुळे या उत्सवाचे महत्त्व अधोरेखित होते.

या मंगलमय उत्सवाच्या निमित्ताने मराठी जागरणने एक प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. सर्वसमावेशक प्रश्नमंजुषा वापरून तुमचे ज्ञान तपासा, ज्यामध्ये भगवान गणेशाचे विविध पैलू, त्यांचे महत्त्व आणि गणेश चतुर्थी परंपरा यांचा समावेश आहे. तर, तुम्ही स्वतःला आव्हान देण्यासाठी आणि आपल्या लाडक्या बाप्पांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तयार आहात का? तर या प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा व त्यातील 10 प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. सहभागी स्पर्धकांमधील भाग्यवान विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू दिली जाईल.

स्पर्धेत कसे सहभागी व्हायचे?

    • मराठी जागरणच्या होमपेजवर असलेल्या ‘गणेश उत्सव प्रश्नमंजुषा या लिंकवर क्लिक करा.
    • तुमच्यासमोर गणेश उत्सव प्रश्नमंजुषा हे पेज ओपन होईल. 
    • त्यानंतर ईमेल किंवा मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा.
    • नोंदणी केल्यानंतर तुम्ही प्रश्नमंजुषा सोडावा.
    • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर Finish Quiz या बटणावर क्लिक करा, त्यानंतर तुमची उत्तरे यशस्वीरित्या जतन केली जातील. 

    प्रश्नमंजुषा ओपन करण्यासाठी येथे क्लिक करा -