जेएनएन, मुंबई.Ganesh Chaturthi 2025 Wishes: देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. घराघरांत, मंडपांत आणि सोसायट्यांमध्ये गणरायाचे स्वागत मोठ्या भक्तिभावाने करण्यात येत आहे. "गणपती बाप्पा मोरया!"च्या घोषणांनी वातावरण भारून गेले आहे.
विघ्नहर्ता श्री गणेशाच्या आगमनाने भक्तांच्या मनात नवी उमेद, आनंद आणि समाधान भरले आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला मोदक, लाडू, फुले, दुर्वा अर्पण करून भक्त आपली मनोकामना व्यक्त करत आहेत. गणेशोत्सवाला महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात विशेष महत्त्व आहे. दहा दिवसांच्या या उत्सवात भक्तिमय कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. या पावन दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा दिल्या देतात
- “गणेश चतुर्थीच्या या पावन पर्वावर बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुमच्या घरात आनंद, सौख्य आणि भरभराट नांदो.”
- “गणेशोत्सवाच्या मंगल दिनी बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख हरून सुख, प्रेम व यशाची भरभराट करो.”
- “गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया! गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मनःपूर्वक शुभेच्छा.”
- “विघ्नहर्ता बाप्पा तुमच्या सर्व अडथळ्यांचा नाश करून यशाचा मार्ग दाखवो. शुभ गणेशोत्सव!”
- “गणपती बाप्पा तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करो आणि सुख-समृद्धीने घर-आंगण उजळवो. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!”
- “गणपती बाप्पा मोरया! तुमच्या घरी लक्ष्मी, सुख-शांती आणि आनंदाची उधळण होवो.”
- “गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना – तुमचे जीवन आनंदाने उजळून निघो. गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा.”
- “गणेशोत्सव तुमच्या जीवनात नवी उमेद, नव्या आशा आणि यश घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!”
- “गणरायाची कृपा तुमच्या घरी सदैव नांदो, आनंद व सौख्याची उधळण होवो. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!”
हेही वाचा: Ganeshotsav 2025: गणपती बाप्पा मोरयाचा असा जयघोष का केला जातो? जाणून घ्या गणेशजींच्या या नावामागील रंजक कहाणी