एजन्सी, नवी दिल्ली. Waqf Amendment Bill: वक्फ दुरुस्ती विधेयकावर स्थापन झालेल्या जेपीसी बैठकीत आज (शुक्रवार) गोंधळ झाला. असदुद्दीन ओवैसी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यासह 10 विरोधी खासदारांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांचा आरोप आहे की त्यांचे ऐकले जात नाही. (Waqf Amendment Bill JPC Meeting)

बैठकीदरम्यान, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यात जोरदार वाद झाला. गोंधळ इतका वाढला की मार्शलला बोलावणे आवश्यक झाले.

या खासदारांना निलंबित करण्यात आले

निलंबित सदस्यांमध्ये कल्याण बॅनर्जी, मोहम्मद जावेद, ए राजा, असदुद्दीन ओवैसी, नसीर हुसेन, मोहिबुल्लाह, मोहम्मद अब्दुल्ला, अरविंद सावंत, नदीम-उल हक, इम्रान मसूद यांचा समावेश आहे. भाजप सदस्य निशिकांत दुबे यांनी विरोधी सदस्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला, जो समितीने मान्य केला.

काश्मीरचे धार्मिक प्रमुख मिरवाईज उमर फारूख यांना बोलावण्यापूर्वी, समिती सदस्यांनी आपापसात चर्चा केली ज्यामुळे जोरदार वादावादी झाली. दिल्ली निवडणुका लक्षात घेऊन वक्फ दुरुस्ती विधेयकावरील अहवाल लवकर स्वीकारण्याचा आग्रह भाजप करत असल्याचा दावा विरोधी नेत्यांनी केला. 

समितीची कार्यवाही "तमाशा" मध्ये बदलली

    तृणमूल काँग्रेसचे सदस्य कल्याण बॅनर्जी आणि काँग्रेसचे सदस्य नसीर हुसेन यांनी बैठकीतून वॉकआउट केले आणि पत्रकारांना सांगितले की, समितीची कार्यवाही "तमाशा" मध्ये बदलली आहे. प्रस्तावित सुधारणांच्या कलम-दर-कलम छाननीसाठी 27 जानेवारी रोजी होणारी बैठक 30 किंवा 31 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली. जेपीसीची बैठक 27 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

    भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणतात

    "विरोधी पक्ष, विशेषतः ओवेसी, यांचा असा विश्वास होता की जम्मू आणि काश्मीरच्या नेत्यांचे पूर्ण म्हटले ऐकले जात नाही आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींना बोलावले पाहिजे होते. विरोधकांच्या सूचनेनुसार, सभापतींनी सभा तहकूब केली. परंतु, मिरवाईज यांच्यासमोर, या लोकांनी गोंधळ घातला, गैरवर्तन केले आणि हे संसदीय लोकशाहीविरुद्धचे कृत्य आहे.", असं या गोंधळाबाबत भाजप खासदार निशिकांत दुबे सांगितलं.

    हेही वाचा - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्र्यंबकेश्वराच्या चरणी लीन, रायगड, नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार?

    बैठकीत जे घडत आहे ते आणीबाणीसारखे : टीएमसी खासदार

    "आम्ही वारंवार 30, 31 जानेवारी रोजी बैठक घेण्याची विनंती केली, परंतु आमची मागणी ऐकली गेली नाही. काल रात्री आम्ही दिल्लीला पोहोचलो तेव्हा बैठकीचा विषय बदलण्यात आला. प्रथम, आम्हाला विचारण्यात आले की 30, 31 जानेवारी रोजी बैठक घ्या. ही बैठक विभागवार होईल असे सांगण्यात आले. बैठकीत जे काही घडत आहे ते अघोषित आणीबाणीच्या कारवाईसारखे आहे. दिल्ली निवडणुकीमुळे ते गोष्टी घाई करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सभापती कोणाचेही ऐकत नाहीत. ते एकाधिकार शाही सारखे वागत आहेत, असं टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी म्हटलं आहे. (Waqf Amendment Bill Latest news)

    हेही वाचा - Rajpal Yadav Father Death: अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, राजपाल यादवच्या वडिलांचे निधन!

    'कल्याण बॅनर्जी यांनी बैठकीत अपशब्द वापरले'

    "बैठकीदरम्यान, कल्याण बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील विरोधी नेत्यांनी जेपीसी अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्याविरुद्ध अतिशय असंसदीय भाषा वापरली. आम्ही याचा निषेध करतो. आम्हाला बैठक व्हावी अशी इच्छा आहे. पण त्याच वेळी, जेपीसी अनिश्चित काळासाठी चालू राहू शकत नाही. संपूर्ण चर्चा संपली पाहिजे, या अनुषंगाने काम सुरु आहे, भाजप खासदार आणि संयुक्त संसदीय समितीच्या सदस्या अपराजिता सारंगी यांनी असं म्हटलं.