एजन्सी, मुंबई. Saif Ali Khan Attacker: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान घरी चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या बांगलादेशी नागरिकानं सैफ अली खानवर चाकूनं हल्ला केला होता. या हल्ल्यात Saif Ali Khan हा जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात सुट्टी मिळाला आहे. तर सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला आज बांद्रा पोलिसांनी कोर्टासमोर हजर केलं होतं. यावेळी मुंबई न्यायालयाने त्याची पोलिस कोठडी 29 जानेवारीपर्यंत वाढवली आहे.

सात दिवसांची कोठडी मागितली

पोलिसांनी आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर (30) याला आज वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर केले होते. प्रकरणातील काही महत्त्वाच्या बाबींवर अधिक तपास आवश्यक असल्याचा युक्तिवाद करत त्यांनी न्यायालयाकडून त्याची आणखी सात दिवसांची कोठडी मागितली.

29 जानेवारीपर्यंत कोठडी 

न्यायालयाने पोलिसांची विनंती मान्य करत आरोपीची कोठडी 29 जानेवारीपर्यंत वाढवली. ठाणे शहरातून अटक करण्यात आलेला खानचा हल्लेखोर बांगलादेशी असून त्याने गेल्या वर्षी बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्यानंतर त्याचे नाव विजय दास असे ठेवले होते, असे पोलिसांनी आधी सांगितले होते.

    सहा वार केले

    वांद्रे येथील त्यांच्या 12 व्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये दरोड्याचा प्रयत्न करताना आरोपीनं सैफ अली खानवर चाकूनं सहा वार केले होते.