जेएनएन, नाशिक. Amit Shah on Maharashtra Tour: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रार्थना केली आहे. ते आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात केेली प्रार्थना
राज्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर असलेले शाह यांनी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रार्थना (Amit Shah in Nashik) केली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन् नेतेही उपस्थित होते.
Maharashtra: Union Home Minister Amit Shah visits Trimbakeshwar Temple in Nashik city to seek blessings pic.twitter.com/hrc0pw2SFU
— IANS (@ians_india) January 24, 2025
बैठकांना संबोधित करणार
सहकार मंत्री अमित शाह हे दिवसाच्या शेवटी मालेगाव आणि मुंबई येथे सहकार क्षेत्राच्या विविध बैठकांना संबोधित करणार आहेत. तसंच, ते नाशकात पदाधिकाऱ्यासोबत बैठकही करणार आहेत.
हेही वाचा - Blast in Bhandara: भंडाऱ्यात शस्त्रसाठ्याच्या कारखान्यात झाले एकामागे एक भीषण स्फोट, 5 जणांचा मृत्यू
पालकमंत्री पद वाटपावरुन तिढा
महायुती सरकारनं मंत्रिमंडळ विस्तारानंतर शनिवारी संध्याकाळी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. यानंतरही काही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पद वाटपावरुन महायुतीत तिढा कायम दिसून आला. यानंतर नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची नियुक्त्या रोखण्यात आल्या. यामुळे महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पद वाटपावरुन तिढा असल्याचं दिसून आलं आहे. अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या तिढ्यावर मार्ग काढला जाईल, अशी चर्चा आहे.
हेही वाचा - National Voters Day 2025: लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकाऱ्यांचा शनिवारी सत्कार!
या जिल्ह्यांची पालकमंत्री कोणाला मिळणार?
नुकतेच जाहीर झालेल्या यादीत नाशिक जिल्ह्याच पालकमंत्री पद भाजपा नेते गिरीश महाजन यांना तर रायगडचं पालकमंत्री पद हे राष्ट्रवादीच्या नेत्या अदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं. मात्र, या पदांच्या नियुक्त्यांना सध्या स्थगिती देण्यात आली आहे. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले यांनी मागणी केली असल्याची माहिती आहे. तर नाशिकचेही पालकमंत्री पद शिंदे गटाला हवं आहे. यासाठी रस्सीखेच सुरु आहे. एकूणच उद्भवलेल्या पेचप्रसंगात अमित शाह काय मध्यस्थी करतात, याकडं लक्ष लागलं, असून या जिल्ह्यांची पालकमंत्री कोणाला मिळतात. याकडे लक्ष लागलं आहे.