जेएनएन, भंडारा Blast at Ordnance Factory. भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 7 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

8 जणांचा मृत्यू

भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत मोठा स्फोट झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार 8 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 7 जण जखमी झाले आहेत, असं नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितलं. तसंच, यावेळी  नितीन गडकरी यांनी भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना एक मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.

कंपनीत दारू गोळा निर्मितीचे सुरु होते कार्य

 सकाळी 11 वाजेच्या सुमारास Ordnance Factory च्या LTCE 23 या इमारतीमध्ये स्फोट झाले. त्यामुळे इमारत पूर्णपणे उध्वस्त झालेली आहे.  सकाळी इमारतीमध्ये पहिला शिफ्टचे लोक काम करत असताना हा स्पोट झालेला आहे. स्फोटाची तीव्रता इतकी होती की या स्फोटामुळे दहा किलोमीटर अंतरापर्यंत घरांना हादरे बसलेत. या कंपनीत दारू गोळा निर्मितीचे कार्य होते. या स्फोटात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - सर्वसामान्यांना मोठा झटका, फडणवीस सरकारनं घेतला 15 टक्क्यांनी बस तिकिटांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय

    संरक्षण मंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

    महाराष्ट्रातील भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत झालेल्या स्फोटाबद्दल जाणून खूप दुःख झाले. घटनास्थळी बचाव पथके तैनात आहेत. बाधितांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे.

    हेही वाचा - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्र्यंबकेश्वराच्या चरणी लीन, रायगड, नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार?