जेएनएन, नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटी प्रकरणावर मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी X या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी कोणत्याही पेपरफुटीच्या घटनांमध्ये प्रकरणांचा जलद निपटारा व्हावा आणि दोषी आढळलेल्यांना त्वरित व कठोर शिक्षा व्हावी, हे सुनिश्चित करण्यासाठी जलदगती न्यायालयात याची सुनावणी होईल, अशी माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट
“देशातील युवकांचे कल्याण आणि भविष्य हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. कोणत्याही पेपरफुटीच्या घटनांमध्ये प्रकरणांचा जलद निपटारा व्हावा आणि दोषी आढळलेल्यांना त्वरित व कठोर शिक्षा व्हावी, हे सुनिश्चित करण्यासाठी जलदगती न्यायालयात याची सुनावणी होईल. आवश्यक ती कारवाई सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना जारी करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारकडून घेण्यात येत असलेल्या निर्णयांच्या मालिकेतील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.” अशी पोस्ट पीएम मोदी X या सोशल मीडियावर केली आहे.

हेही वाचा - Sharad Pawar: पंतप्रधान मोदींची का घेतली भेट अन् बंद दाराआड काय केली चर्चा? शरद पवारांनी थेटच सांगितलं
दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणावरून जंतरमंतरवर CJP चे आंदोलन सुरु आहे. सोनम वांगचुक हे उपोषण करत आहेत. त्यांच्यावर सध्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून या पेपरफुटी प्रकरणावर चर्चा करण्यासाठी गोंधळ सुरु आहे. मागील तीन दिवसांपासून या गोंधळामुळे संसदेचे कामकाज जास्त वेळा स्थगित करावे लागले आहे. आता सरकारने याप्रश्नावर चर्चा करण्याची मागणी मान्य केली आहे. दरम्यान, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे.
