जेएनएन, नवी दिल्ली. MP Praniti Shinde on Operation Sindoor: संसदेचे पावसाळी सुरु आहे. या अधिवेशनात पहलगाम येथे झालेल्या क्रृर हल्ल्यावर आणि त्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदुर द्वारे केलेल्या कारवाईवर चर्चा सुरु आहे. या चर्चेत भाग घेत सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी ऑपरेशन सिंदूरला 'तमाशा' म्हणत सरकारवर टीका केली.

ऑपरेशन सिंदूर हा एक 'तमाशा'

‘सरकारवर सत्य लपवून फक्त माध्यमांमध्ये प्रशंसा मिळवत आहे. प्रत्यक्षात, ऑपरेशन सिंदूर हा एक 'तमाशा' होता. सरकारने ऑपरेशन सिंदूरमधून देशाला काय फायदा झाला? या कारवाईत किती दहशतवादी पकडले गेले? पाकिस्तानने भारताची किती विमाने पाडली? या कारवाईत झालेल्या चुकांसाठी कोण जबाबदार आहे?’ असे सवाल त्यांनी चर्चेदरम्यान केले.

‘सरकारने उत्तर द्यावे’

‘या ऑपरेशनमध्ये काय साध्य झाले? हे कोणीही सांगत नाही. किती दहशतवादी पकडले गेले? आपण किती लढाऊ विमाने गमावली? यासाठी कोण जबाबदार आहे? कोणाची चुकी आहे, याचे उत्तर सरकारने द्यावे,’ असं त्या म्हणाल्या.

‘देशात सध्या प्रश्न विचारण्यावर बंदी’

     ‘देशात सध्या प्रश्न विचारण्यावर बंदी आहे. सरकार प्रश्न ऐकू इच्छित नाही. तर हे सरकार जबाबदारीपासून पळत आहे. मुख्य मुद्द्यांपासून नागरिकांचे लक्ष हटवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी खेळ आणि मनोरंजनात जनतेला व्यस्त ठेवले जात आहे. यामध्ये आता निवडणुकीपूर्वी दहशतवादी हल्ल्याची भर पडली आहे’ अशी टीका शिंदे यांनी केली. 

    पंतप्रधान बिहारमध्ये सभेला संबोधित करण्यासाठी गेले

    ‘दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरात कारवाई केली जाते. दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? हे सरकारला माहिती नाही. मात्र, सरकारला शेजारी देशावर हल्ला करायचा आहे आणि त्याच्या आधारावर मते मिळवायची आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान बिहारमध्ये निवडणूक सभेला संबोधित करण्यासाठी गेले होते. पंतप्रधान 24/7 निवडणूक मोडमध्ये असतात.’ असंही त्या म्हणाल्या. 

    ‘अमेरिकेच्या दबावाखाली शस्त्रसंधी’

    मला आपल्या सैनिकांच्या शौर्याबद्दल अजिबात शंका नाही, मात्र हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला माहिती देणे आणि अमेरिकेच्या दबावाखाली शस्त्रसंधी करणे, हे चूकीचे होते. एकेकाळी भारताच्या सर्वात जवळ असलेले नेपाळ, बांग्लादेश आणि श्रीलंका आज चीनशी हातमिळवणी करत आहेत", अशीही टीका त्यांनी सरकारवर केली.