जेएनएन, नवी दिल्ली. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावरील चर्चा आज दुपारपासून लोकसभेत सुरु झाली. लोकसभेचे कामकाज सकाळी 11वाजता सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घातला. त्यानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यावर लोकसभेत एकूण 16 तास चर्चा होणार आहे. या चर्चेत पंतप्रधान मोदी देखील सहभागी होतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून ही चर्चा सुरू होईल.
जयशंकर सभागृहात काय म्हणाले…
सभागृहात, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीपासून ते पाकिस्तानी दूतावासातील सदस्यांना पर्सन्स नॉन ग्राटा म्हणून घोषित करण्यापर्यंत सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिली. ते म्हणाले की, दूतावासांना माहिती देण्याव्यतिरिक्त, माध्यमांमध्ये असेही सांगण्यात आले की भारताला आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे.
फक्त तीन सदस्यांनी या ऑपरेशनला विरोध केला
ते म्हणाले, "पाकिस्तान सुरक्षा परिषदेचा सदस्य आहे, आम्ही नाही. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानबद्दल सांगितले. पाकिस्तानने जेव्हा आपली रेड बॉर्डर ओलांडली, त्यानंतर आम्हाला कठोर पावले उचलावी लागली. आम्ही जगासमोर पाकिस्तानचा खरा चेहरा उघड केला. पाकिस्तानसह फक्त तीन देशांनी सुरक्षा परिषदेत ऑपरेशन सिंदूरला विरोध केला. संयुक्त राष्ट्रांच्या 193 सदस्यांपैकी फक्त तीन सदस्यांनी या ऑपरेशनला विरोध केला, असं म्हणतं त्यांनी अरविंद सावंत यांना उत्तर दिलं. तसंच, सर्व देशांत भारतीय प्रतिनिधींचा योग्य सन्मान झाला, असं विदेशमत्री म्हणाले.
सभागृहात ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, "ते (विरोधी पक्ष) भारतीय परराष्ट्र मंत्र्यांवर विश्वास ठेवत नाहीत तर दुसऱ्या देशातील व्यक्तीवर विश्वास ठेवतात यावर माझा आक्षेप आहे. त्यांच्या पक्षात परदेशी व्यक्तीचे महत्त्व मी समजू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या पक्षाच्या सर्व गोष्टी येथे सभागृहात लादल्या पाहिजेत. म्हणूनच ते तिथे (विरोधी पक्षाच्या बाकांवर) बसले आहेत आणि पुढील 20 वर्षे तिथेच बसतील."