डिजिटल डेस्क, नवी दिल्ली. online gaming bill 2025 : ऑनलाइन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल, २०२५ गुरुवारी (२१ ऑगस्ट २०२५) संसदेत मंजूर करण्यात आले. कोणत्याही चर्चेशिवाय गोंधळात हे विधेयक मंजूर करण्यात आले.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सादर केलेल्या या विधेयकाचा उद्देश ई-स्पोर्ट्स आणि ऑनलाइन सोशल गेमिंगला प्रोत्साहन देताना सर्व प्रकारच्या ऑनलाइन मनी गेमवर बंदी घालणे आहे.

बुधवारी लोकसभेने केले होते मंजूर- 

विरोधी सदस्यांनी मांडलेल्या सुधारणा फेटाळून लावल्यानंतर वरिष्ठ सभागृहाने ते मंजूर केले. तत्पूर्वी, बुधवारी लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले.

विधेयकात कोणत्या तरतुदी आहेत?

यामध्ये ऑनलाइन मनी गेमशी संबंधित जाहिरातींवर बंदी घालण्याची तरतूद आहे आणि बँका आणि वित्तीय संस्थांना अशा कोणत्याही गेमसाठी निधी प्रदान करण्यास किंवा हस्तांतरित करण्यास मनाई आहे. रोख रक्कम आणि इतर बक्षिसे जिंकण्याच्या आशेने पैसे जमा करून ऑनलाइन मनी गेम खेळले जातात.

    1400 पेक्षा जास्त ॲप्सवर बंदी -

    विधेयक मंजूर झाल्याने आता केवळ तेच ऑनलाइन गेमिंग ॲप्स शिल्लक राहतील, जे खेळण्यासाठी कोणतेही शुल्क किंवा पैसे द्यावे लागत नाहीत. सरकार अनेक वर्षांपासून बेटिंग ॲप्सवर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहे आणि गेल्या चार-पाच वर्षांत 1400 पेक्षा जास्त ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे.

    Dream11 सारख्या गेमिंग ॲप्सवरही बंदी-

    विधेयकानुसार, कोणत्याही बँकेला ऑनलाइन गेमिंग खेळण्यासाठी व्यवहार करण्याची परवानगी नसेल. सध्या अनेक ऑनलाइन गेम्स आहेत ज्यात बेटिंग होत नाही, पण ते खेळण्यापूर्वी शुल्क द्यावे लागते. क्रिकेट टीम बनवणाऱ्या Dream11 सारख्या गेमिंग ॲप्सवरही बंदीची कुऱ्हाड कोसळू शकते.