जेएनएन, मुंबई : आनंद, उत्साह आणि भक्तिभावाने साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवाचा समारोप आज देशभरात मोठ्या उत्साहात झाला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या गजरात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. मुंबई, पुणे, नागपूर, तसेच इतर शहरांमध्ये हजारो मंडळांनी मिरवणुका काढत भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाला निरोप दिला.

मुंबईत लालबागचा राजा, अंधेरीचा महोत्सव मंडळ, गिरगावचा गणपती यांसारख्या मानाच्या गणेशांचे विसर्जन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम आणि नृत्याच्या तालावर भक्तांनी नाचत गात विसर्जन मिरवणुकांत सहभाग घेतला. पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीने देखील भाविकांची मने जिंकली.

पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर पर्यावरणपूरक विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, पाण्याचे टाकी आणि मोबाइल विसर्जन केंद्रांची सोय करण्यात आली होती.

  • 2025-09-06 17:30:00

    लालबागचा राजावर श्रॉफ बिल्डिंगजवळ पुष्पवृष्टी

    मुंबईत लालबागच्या राजची विसर्जन मिरवणूक सुरु असून, लालबागचा राजावर मुंबईतील श्रॉफ बिल्डिंगजवळ पुष्पवृष्टी व गुलालाची उधळण करण्यात आली. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक पाहण्याकरिता अलोट गर्दी उसळली आहे.
  • 2025-09-06 16:00:00

    दगडूशेडचा बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ

    पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जनाला सुरवात झाली असून, पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले. त्यांनतर आता दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी पोलिसांनी दिलेल्या वेळेनुसार थोड्याच वेळात मार्गस्थ होणार आहे.
  • 2025-09-06 15:50:00

    पुण्यातील मानाच्या गणपतीचं विसर्जन

    पुण्यातील ग्रामदैवत मानाचा पहिला गणपती म्हणून पुजल्या जाणाऱ्या कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले असून, विसर्जनस्थळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पर्यावरणपूरक पद्धतीनं बाप्पाला देण्यात आला निरोप...
  • 2025-09-06 13:15:00

    लालबागचा राजा मुख्य मंडपाबाहेर

    लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली असून, बाप्पाची मूर्ती मुख्य मंडपाबाहेर आली. लालबागच्या राजावर गुलाल आणि फुलांची उधळण केली जात आहे. देशभक्तीपर गीतांच्या तालावर भक्तांचा उत्साह देखील शिगेला पोहोचला आहे.
  • 2025-09-06 13:10:00

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या बाप्पाचे विसर्जन

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी गणेश आरती केली. आरतीनंतर वर्षा निवास्थानी स्थापित बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल.
  • 2025-09-06 11:35:00

    लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ

    लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली असून, भाविकांची अलोट गर्दी या मिरवणुकी दरम्यान पाहायला मिळत आहे. मुंबईत मुसळधार पावसा दरम्यान देखील भाविकांनी लालबागच्या राजाची मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली आहे. सर्वात मोठी ही लालबागच्या राजाची मिरवणूक असते. हेही वाचा:Lalbaugcha Raja Ganesh Visarjan Live: ही शान कोणाची.. गर्दीत जाण्याचं टेन्शन नको घरबसल्या पाहा लालबागच्या राजाची लाईव्ह विसर्जन, मिरवणुकीचा मार्ग कोणता?
  • 2025-09-06 11:15:00

    नागपूरचा राजाची मंगल आरती

    गणेश मूर्तीच्या विसर्जनापूर्वी नागपूरचा राजाची मंगल आरती केली जात आहे. यावेळी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली.
  • 2025-09-06 10:35:00

    लालबागच्या राजाची आरती संपन्न

    महाराष्ट्रातील मुंबईत लालबागच्या राजाच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी 'विसर्जन मिरवणूक' लवकरच सुरू होणार आहे. लालबागच्या राजाची आरती संपन्न
  • 2025-09-06 09:20:00

    एकनाथ शिंदेनी घेतले लालबागच्या राजचे दर्शन

    मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब उपस्थित होते. थोड्याच वेळात लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरवात होणार असून, त्याआधी एकनाथ शिंदे यांनी गणेशाचे दर्शन घेतले. हेही वाचा: Anant Chaturdashi 2025 : गणेश विसर्जनासाठी मुंबईत 21 हजार पोलीस कर्मचारी, 10 हजार सीसीटीव्ही, ड्रोन व पहिल्यांदाच AI चा वापर!
  • 2025-09-06 09:15:00

    मुबंईत मुसळधार पाऊस

    मुंबईत विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली असून, पावसाचा जोर देखील वाढत आहे. अधून-मधून पावसाची संततधार कोसळत आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश साधारण ढगाळ राहणार असून, उपनगरात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याच्या शक्यता असून, तसेच काही ठिकाणी रात्री आणि पहाटे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या वर्तविण्यात आली आहे.
  • 2025-09-06 09:05:00

    तुळशीबागेतील मानाचा चौथा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ

    पुण्यातील तुळशीबागेतील मानाचा चौथा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. विसर्जन मिवरणुकीत गणेश भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. हेही वाचा:Pune ganeshotsav 2025 : विसर्जन गणेश मूर्तीचे व्हिडिओ बनवाल तर होणार कारवाई, पुणे पोलिसांकडून आदेश जारी
  • 2025-09-06 08:50:00

    तांबडी जोगेश्वरी येथील मानाचा गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी

    पुण्यातील तांबडी जोगेश्वरी येथील मानाचा गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला आहे. विसर्जनाआधी शंखनाद करण्यात आला. तसेच तांबडी जोगेश्वरी येथील गणपतीची विसर्जन मिरवणूक चांदीच्या रथातून काढली जाते. पारंपरिक पद्धतीने या गणपतीची मिरवणूक निघाली आहे. हेही वाचा:Anant Chaturdashi 2025: श्री गणेश विसर्जनासाठी पुणे मनपा सज्ज; सुरक्षा, स्वच्छता व पर्यावरणपूरक सोयींची जय्यत तयारी
  • 2025-09-06 08:40:00

    गणेश गल्लीचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ

    मुंबईतील गणेश गल्लीचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. गणेश गल्लीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जात आहे.
  • 2025-09-06 08:30:00

    मुंबईत विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदाच AI चा वापर

    मुंबईत  अनंत चतुर्दशीदिवशी मूर्ती विसर्जनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबईत 21,000 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्तात 12 अतिरिक्त पोलिस आयुक्त, 40 उपायुक्त, 61 सहाय्यक आयुक्त, 3000 अधिकारी आणि 18,000 पोलिस कर्मचारी सहभागी असतील. विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदाच, पोलिस मार्ग व्यवस्थापन आणि इतर वाहतूक-संबंधित अपडेटसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता artificial intelligence (AI)  चा वापर केला जाणार आहे.
  • 2025-09-06 08:10:00

    उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नीसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अनंत चतुर्थीची पूजा केली.
  • 2025-09-06 08:00:00

    विसर्जन मिरवणूकीला सुरवात

    श्री गणेशाची दहा दिवस भक्तिभावाने पूजा अर्चना केल्यानंतर आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर देशभरात गणेश विसर्जन करण्यात येत आहे. मुंबई, पुण्यासह इतरही शहरांमध्ये मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक निघण्यास सुरवात झाली आहे.