जेएनएन, नवी दिल्ली. Crime News : निहाल विहार पत्नीचे पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पत्नीने धक्कादायक कारण सांगितले आहे. पत्नीने प्रथम तिच्या पतीला झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केले आणि नंतर चाकूने वार करून त्याची हत्या केली. महिलेचे बरेलीमध्ये राहणाऱ्या तिच्या चुलत दिरासोबत अनैतिक संबंध होते.

आरोपी पत्नीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पतीने आत्महत्या केल्याची  कहाणी रचली. एफआयआर दाखल केल्यानंतर, जेव्हा पोलिस मृत शाहिदच्या घरी चौकशीसाठी पोहोचले तेव्हा गुन्हे पथक आधीच तेथे उपस्थित होते. फरजानाने घराची फरशी साफ केल्याचे आढळले. 

पोलिसांनी हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न मानला आणि फरजानावर संशय वाढला. पोलिसांनी फरजानाची चौकशी केली तेव्हा तिने वेगळीच कहाणी सांगायला सुरुवात केली. पोलिसांनी तिचा मोबाईल फोन जप्त केला आणि त्याची तपास केली.

मोबाईलमधील सर्च हिस्ट्री हटवली -

मोबाईल हिस्ट्रीवरून असे दिसून आले की फरजानाने युट्यूबवर खून कसा करायचा याचा व्हिडिओ पाहिला होता. याशिवाय तिने तो गुगलवरही शोधला होता. नंतर सर्च हिस्ट्री देखील डिलीट करण्यात आली आणि तिच्या मोबाईलवर व्हिडिओ पाहिल्याचे संकेत सापडले. जेव्हा संशय निश्चित झाला तेव्हा पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच तिने  हत्येची कबुली दिली.

    पती बेडवर शारीरिक तृप्ती देत नव्हता-

    महिलेने सांगितले की, लग्नापासून ती तिच्या पतीवर खूश नव्हती. तिचा पती तिला शारीरिक सुख देऊ शकत नव्हता. यामुळे तिने त्याला मारण्याचा कट रचला.

    रविवारी तिने पतीला जेवणात नशेच्या गोळ्या घातल्या. नंतर, तो झोपेत असताना त्याच्या पोटात वार करून त्याची हत्या केली. नंतर, तिने कुटुंबाला सांगितले की तिच्या पतीने स्वतःच्या पोटात वार केला आहे. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, परंतु तेथे त्याला मृत घोषित केले.

    फरजाना आणि शाहिद यांचे तीन वर्षापूर्वी लग्न -

    २०२२ मध्ये फरजाना आणि शाहिदचे लग्न झाले. शाहिद फरजानापेक्षा सात वर्षांनी मोठा होता. त्यांचे दोन्ही कुटुंब मूळचे बरेलीचे आहे. शाहिद वेल्डर म्हणून काम करायचा. लग्नानंतर फरजाना दिल्लीला आली. फरजानाला तिचा वेल्डर नवरा कधीच पसंत नव्हता. 

    आपल्या वैवाहिक जीवनावर नाखूष असलेली फरजाना हळूहळू बरेलीमध्ये राहणाऱ्या तिच्या चुलत दिराशी जवळीक साधू लागली. चुलत भावाचा या हत्येत काही सहभाग आहे की नाही, याचा तपास केला जात आहे. पोलिस फरजानाची कॉल हिस्ट्री आणि व्हॉट्सअॅप चॅट्सचीही चौकशी करत आहेत. पोलिसांचे पथक तपासासाठी बरेलीलाही जाणार आहे.