एजन्सी, मुंबई: मुंबईतील नागरी निवडणुकीसाठी शिवसेना (यूबीटी) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील युतीची बहुप्रतिक्षित घोषणा बुधवारी होऊ शकते, असे संकेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले.
संजय राऊतांचे सूचक ट्वीट
मंगळवारी X वरील एका पोस्टमध्ये राऊत यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे भाऊ, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे. त्या "उद्या दुपारी 12 वाजता" असे त्यांनी कॅप्शन दिले आहेत.

युतीची घोषणा आज होण्याची होती चर्चा
राज आणि उद्धव ठाकरे हे आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना (उद्धव गट) नेते संजय राऊत यांनीही युतीबाबत सकारात्मक संकेत दिले असून, “योग्य वेळी मोठी घोषणा होईल,” असे सूचक विधान केले आहे.
मागील अनेक दिवसांपासून चर्चा
15 जानेवारी रोजी होणाऱ्या महत्त्वाच्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये युतीची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे.
