जेएनएन, मुंबई. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (municipal corporation election) 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे.  तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत (BMC Election 2026) आहे. सर्व महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.

काँग्रेसची 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रभारी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, खासदार, आमदार व वरिष्ठ पदाधिकारी यांचा यात समावेश आहे. चला जाणून घेऊया त्यांची नावे…

यादीतील नेत्याची नावे

  1. रमेश चेन्निथला 
  2. हर्षवर्धन सपकाळ 
  3. विजय वडेट्टीवार 
  4. छत्रपती शाहु महाराज 
  5. सतेज उर्फ बंटी पाटील 
  6. मुकुल वासनिक 
  7. रेवंत रेड्डी 
  8. पृथ्वीराज चव्हाण 
  9. सचिन पायलट 
  10. बाळासाहेब थोरात 
  11. मोहम्मद अझरुद्दीन 
  12. रजनीताई पाटील 
  13. माणिकराव ठाकरे 
  14. नानाभाऊ पटोले 
  15. इम्रान प्रतापगढी 
  16. चंद्रकांत हंडोरे 
  17. आरिफ नसिम खान 
  18. राज बब्बर 
  19. यशोमती ठाकूर
  20. प्रणिती शिंदे 
  21. अमिन पटेल 
  22. डॉ. नितीन राऊत 
  23. सुनिल केदार 
  24. अमित देशमुख 
  25. डॉ. विश्वजीत कदम 
  26. भाई जगताप 
  27. अनिस अहेमद 
  28. रमेश बागवे 
  29. हुसेन दलवाई 
  30. साजीद खान पठाण 
  31. कन्हैया कुमार
  32. जिग्नेश मेवाणी 
  33. प्रा. वसंत पुरके 
  34. मुझफ्फर हुसेन 
  35. एम. एम. शेख
  36. मोहन जोशी 
  37. डॉ. वजाहत मिर्झा 
  38. अतुल लोंढे
  39. सिध्दार्थ हत्तिअंबीरे
  40. हनुमंत पवार

मुंबई महानगरपालिके निवडणुकीच्या महत्वाच्या तारखा 

  • नामनिर्देशनपत्र स्वीकारणे- 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025
  • नामनिर्देशनपत्रांची छाननी - 31 डिसेंबर 2025
  • उमेदवारी माघारीची अंतिम मुदत-  02 जानेवारी 2026
  • निवडणूक चिन्ह वाटप-  03 जानेवारी 2026
  • अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026
  • मतदानाचा दिनांक- 15 जानेवारी 2026
  • मतमोजणीचा दिनांक- 16 जानेवारी 2026

हेही वाचा - Maharashtra Local Body Election Date: राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान आणि निकाल या दिवशी, सविस्तर माहिती