जेएनएन, मुंबई. Shivaji Maharaj Jayanti 2025: आज 19 फेब्रुवारी रोजी देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. देशभरात ठिकठिकाणी शिव जयंती निमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जाते मिरवणूका काढल्या जातात. महाराजांची शोर्याची त्यांच्या कीर्तीचे गुणगान केले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला तिथे देखील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आज आपण त्यांच्या शोर्याची गाथा सांगणाऱ्या पोवाड्यांबद्दल माहिती घेणार आहोत. महाराजांची कीर्ती सांगणारे हे पोवाडे एकूण तुम्ही देखील शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करू शकता. 

शिवाजी महाराजांनी आपल्या कुशल युद्धनीतीमुळे अनेक लढाया जिंकल्या व मुघलांना धुळीस मिळवले. स्वरजायची स्थापना करण्याचा हा मार्ग इतका सोप्पा नव्हताच. यासाठी मोठी हिम्मत पाहिजे होती आणि ती महाराज आणि त्यांच्या मावळ्यांमध्ये होती. शत्रूंना हरविण्यासाठी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी दिलेल्या लढ्याचे वर्णन राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी त्यांच्या पोवाड्यामधून सांगण्याचा पर्यंत केला आहे. 

इतिहासात झालेल्या लढायांमध्ये आजही मोठ्या अभिमानाने वर्णिली जाते ती म्हणजे महाराजांची अफजलखानाशी झालेली भेट आणि प्रतापगडच्या पायथ्याशी केलेला अफजल खानचा वध, महाराजांना संपविण्याचे प्रण घेऊन आलेल्या अफजलखानाला महाराजांनी गनिमी काव्याद्वारे मोठ्या शिताफीने आपल्या जाळ्यात ओढले व वाघनखांचा वापर करून त्याला धुळीस मिळवले याच घटनेचा उल्लेख प्रतापगडाचा रणसंग्राम या पोवाड्यातून करण्यात आला आहे. 

https://www.youtube.com/watch?v=htHTgTbxw0I&t=5s

धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर, केले जरजर पाजूनी पाणी दृष्ट मोगलास

     घडविला स्वराज्याचा इतिहास 

    अश्या शब्दांनी शाहीर रामानंद उगले यांनी आपल्या पोवाड्यातून छत्रपतींचा गौरवशाली इतिहास मांडला आहे. सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात महाराजांचा असल्लेया वावर आजही त्यांची शोर्याची गाथा सांगतो आहे. सह्याद्रीच्या काण्या कोपऱ्यातील गाथा या पोवाड्यातून आपल्यापर्यंत पोहचवली आहे.