जेएनएन, मुंबई. Shiv Jayanti 2025: स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रू विरोधात कठोर युद्धनीती वापरली होती. त्यांच्या या युद्धनीतीचा शत्रूंमध्ये इतका धाक होता की, छत्रपती शिवाजी महाराज हे नाव एकताच शत्रूंच सैन्य कापायला लागायचं. महाराजांच्या युद्धनीतीमुळे कमी सैन्यात देखील शत्रूंच्या बलाढ्य सैन्याला हरवले मावळ्यांना शक्य असायचं. स्वराज्य काबीज करताना महाराजांनी अशी अनेक  युद्धनीती वापरली जी अजरामर झाली. महाराजांच्या याच युद्धनीती आजही विविध नावांनी देश विदेशात वापरली जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आजच्या या लेखातून आपण महाराजांच्या याच युद्धनीबद्दल जाणून घेणार आहोत. 

छत्रपती शिवजी महाराजांनी वापरलेल्या युद्धनीती 

  • गनिमी कावा युद्धनीती
  • प्रकाश युद्धनीती 
  • कूट युद्धनीती

गनिमी कावा युद्धनीती
शिवाजी महाराजानी वापरलेल्या युद्धनीतीपैकी 'गनिमी कावा' ही सर्वात प्रचलित युद्धनीती होती. ज्याचा वापर करून महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या. गनिमी कावा युद्धनीतीमध्ये शत्रू बेसावध असताना हल्ला केला जायचा आणि शत्रू सावध होण्याआगोदरच माघार घेतली जायची. यामुळे शत्रूला उलट कारवाईसाठी वेळ उरायचा नाही. स्वराज्यात महाराजांनी वापरलेली ही युद्धनीती आज 'गोरिला वॉर' म्हणून ओळखल्या जाते. या युद्धनीतीचा वापर करण्यामागे एकच उद्दिष्ट होते ते म्हणजे आपल्यावर चालून आलेल्या शत्रूला कोणत्याही मार्गाने परतवून लावणे. 

हेही वाचा: Shiv Jayanti 2025: जहाजे फुटली, इंग्रज पळाले – जाणून घ्या मराठ्यांच्या अभेद्य आरमाराची कहाणी

गनिमी काव्यामध्ये प्रामुख्याने शत्रूला घाबरविणे किंवा दहशत बसविणे,शत्रूचे मानसिक खच्चीकरण करणे, शत्रूला आर्थिकदृष्ट्या शत्रूला अपंग करणे, शत्रू शरण येण्यास बाध्य होईअशी परिस्थिती तयार करणे याचा गनिमी काव्यात वपर केला जायचा. तसेच गनिमी काव्यामुळे शत्रूला लढाई मैदान सोडून पळून जावयास लावणे, शत्रूपर्यंत मुद्दाम चुकीची माहिती पुरविणे, आपण दुर्बल आहोत किंवा आपल्यात लढाईची हिम्मत नाही असे भासविणे, आपल्याला लढाईसाठी अनुकूल असे क्षेत्र निवडून कसेही करून शत्रूला तेथे नेणे, शत्रूचे नुकसान करून दरारा निर्माण करणे तसेच शत्रू सैन्यातील म्होरक्यास ठार करणे, ज्याने शत्रुसैन्यात गोंधळ माजतो इत्यादींचा युक्तीचा वापर गनिमी कावा युद्धनीती पद्धतीत केला जायचा.


प्रकाश युद्धनीती
छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या युद्धनीतीपैकीच एक म्हणजे प्रकाश युद्धनीती. या युद्धनीती प्रकारात शत्रूला आधीच लढाईसाठीच माहिती दिली जायची जिथे दोन्ही बाजूचे सैन्य आमोरासमोर लढाई करत असत. या युद्ध प्रकारात दोन्ही बाजूचे सैन्य वेळ, काळ व स्थळ यांची आधीच घोषणा केली जायची. यालाच प्रकाश युद्धनीती म्हटले जाते. ज्यात कोणतीही गोष्ट लपवून किंवा छुप्या पद्धतीने केली जात नसत.
हेही वाचा:Shiv Jayanti 2025 Wishes: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त या संदेशांनी द्या आपल्या प्रियजनांना शुभेच्छा

कूट युद्धनीती
कूट युद्धनीती त्यावेळी वापरली जाते ज्यावेळी आपले सैन्य शत्रूच्या सैन्यापेक्षा संख्येने जास्त असते शत्रुसेने फितुरी झालेली असली पाहिजे तेव्हाचे युद्ध केले जाते त्याला कूट नीती असे म्हणतात कूटनीतीने युद्ध करण्यासाठी उपयुक्त स्थळे म्हणजे वृक्षस्थळी असलेले किल्ले, वनदुर्ग काट्याकुट्यांची अरण्ये, पाणथळ जमीन,  उंच सखल जमीन असलेला भूभाग अशी स्थळे कूटनीतीच्या पद्धतीने जिंकता येतात. 

कूट युद्धनीतीमध्ये आपला पराभव झाला आहे असे भासवायचे आणि माघार घ्यायला सुरुवात करायची असे केले की शत्रू पाठलाग करतो व पाठलाग करणारी तुकडी मुख्य सेनेपासून वेगळी पडते अशावेळी आपला मोहरा पालटायचा याच कूट युद्धनीचा वापर करून शिवाजी महाराजांनी कुडाळची लढाई जिंकली होती. 

हेही वाचा: Shiv Jayanti 2025: बदलापुरात शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण