सांगली. Sangli district bank election results 2026: अत्यंत चुरशीने लढल्या गेलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आणि मिरज पंचायत समितीचे माजी सभापती अण्णासाहेब कोरे यांचा विजय झाला आहे. आ. पडळकर यांचा विजय माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यासह प्रस्थापितांना राजकीय धक्का मानला जात आहे. जिल्हा बँकेच्या 21 जागापैकी 15 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित सहा जागासाठी रविवारी मतदान झाले त्यांचा आज निकाल लागला. सहा जागापैकी तासगाव, मिरज, जत आणि कवठेमहांकाळ या तालुका विकास संस्थातून झालेल्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या कवठेमहांकाळ सोसायटी गटातून माजी मंत्री अजितराव घोरपडे, जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर, तासगावमधून माजी खासदार संजय पाटील, मिरजमधून आण्णासाहेब कोरे विजयी झाले आहेत.
विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्ग गटातून संभाजी कचरे आणि अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती गटातून कृष्णा कांबळे यांनी विजय मिळवला. एकूण २१ पैकी 15 जागा बिनविरोध झाल्या होत्या. यामुळे 6 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात होते..
सुमन पाटील यांचा अवघ्या एका मताने पराभव -
तासगावमध्ये माजी आमदार सुमन पाटील यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. येथे एकूण वैध मतांची संख्या 78 होती. संजय पाटील यांना 40 तर सुमन पाटील यांना 38 मते मिळाली. येथे आमदार रोहित पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण अटीतटीच्या लढतीत संजय पाटील अखेर विजयाचा गुलाल उधळला. जतमध्ये गोपीचंद पडळकर 20 मतांनी विजय मिळवला. त्यांना 54 मते मिळाली. तर विनोद पवार यांना 34 मते मिळाली.
उमेदवारांना मिळालेली मते
कवठेमहांकाळ तालुका
अजितराव घोरपडे- 37 मते
तानाजी पाटील- 33 मते
जत तालुका
गोपीचंद पडळकर- 54 मते
विनोद पवार- 34 मते
तासगाव तालुका
संजय पाटील- 40 मते
सुमन पाटील- 38 मते
मिरज तालुका
आण्णासाहेब कोरे-47 मते -विजयी
अनिल शेगुनशे- 19 मते
विमुक्त जाती, भटक्या जमाती
संभाजी कचरे- 1,974 मते- (विजयी)
अमित पारेकर- 189 मते
शंकर माने- 46 मते
अनुसूचित जाती- अनुसूचित जमाती
कृष्णा कांबळे- 1,914 मते (विजयी)
विलास बेले- 176 मते
बाबासाहेब मधाळे- 112 मते
Sangli Bank Election Winners List: सांगली जिल्हा सहकारी बँकेतील सर्व २१ विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी -
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
1) देवराज पाटील -बिनविरोध
2) वैभव शिंदे -बिनविरोध
3) विराज नाईक -बिनविरोध
4) संभाजी कचरे - विजयी
5) रणधीर नाईक - बिनविरोध ( कोटा श.प)
काँग्रेस
1) विश्वजीत कदम - बिनविरोध
2) महेंद्र लाड -बिनविरोध
3) पूजा पाटील - बिनविरोध
4) वर्षा सावंत - बिनविरोध
5) अण्णासाहेब कोरे - विजयी
6) कृष्णा कांबळे - विजयी
भाजप
1) गोपीचंद पडळकर - विजयी
2) सतीश देशमुख - बिनविरोध
3) अपर्णा देशमुख -बिनविरोध
4) राहुल महाडिक -बिनविरोध
5) पृथ्वीराज पाटील -बिनविरोध
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
1) संजयकाका पाटील - विजयी
2) अजितराव घोरपडे - विजयी
शिंदे शिवसेना
1) तानाजी पाटील - बिनविरोध
2) अमोल बाबर - बिनविरोध
3) नितीन होणराव - बिनविरोध
