जेएनएन, मुंबई: शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगासह राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. “त्याच मतदान यंत्रांनी, विधानसभेसारखेच निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आले आहेत; त्यांनी महाराष्ट्राला लुटून पैशांची उधळपट्टी केली” असं संजय राऊत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालांवर म्हणाले.

नगरपरिषद-नगरपालिका निवडणुकीत तेवढेच सिट 

‘भाजपा हे पहिला नंबरचा पक्ष कसा बनतो, हे सर्वांना माहिती आहे. जे बिहारमध्ये झाले आहे. तेच महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणूकीत झाले आहे. विधानसभा निवडणुकीत जे निकाल आले होते, तेच नगरपालिका निवडणुकीत आले आहेत.

विधानसभेत भाजपाच्या 120-125 च्या जवळपास जागा आला होत्या. आता नगरपरिषद-नगरपालिका निवडणुकीत तेवढेच सिट आलेत. शिंदेंच्या 54 च्या जवळपास जागा आल्या होत्या. आताही 54 जवळ आल्या आहेत. आणि अजित पवारांच्या विधानसभेत 40-42 जागा आल्या होत्या आताही त्या जवळपास आहेत,’ असं संजय राऊत म्हणाले. आकडेतर बदल दो, असंही ते म्हणाले.

पैसा कुठून येत आहे

नगर परिषद- नगरपालिका निवडणुकीत पैसा पाण्यासारखा ओतला होते. नगरपरिषद- नगरपालिकेचे बजेट हे 25 कोटी असताना तिथे 150 ते 200 कोटी रुपये खर्च केले. हा पैसा कुठून येत आहे, याचं उत्तर सरकारने द्यायला हवं, असंही राऊत म्हणाले. महाराष्ट्राला लुटून पैशांची उधळपट्टी सुरु आहे. एक दिवस लोकशाही या सर्वांना धक्के मारून बाहेर फेकून देईल, असं राऊत म्हणाले.