एजन्सी, पुणे. सोलापूर जिल्ह्यात एका 30 वर्षीय महिलेने तिच्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेत दोन्ही मुलांसह महिलेचाही बुडून मृत्यू झाला आहे, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.
प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, महिलेचे सात आणि दीड वर्षांच्या दोन्ही मुले दिव्यांग असल्याने ती नैराश्यात होती, असे पोलिसांनी सांगितले.
विहिरी आढळले मृतदेह
"ही घटना बुधवारी सकाळी वांगी गावातील कुटुंबाच्या शेताजवळ घडली. महिला आणि एका मुलाचे मृतदेह बुधवारीच बाहेर काढण्यात आले, तर दुसऱ्या मुलाचा मृतदेह गुरुवारी सकाळी बाहेर काढण्यात आला," असे सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
आठ वर्षांची मुलगी मागे
दोन मुलांव्यतिरिक्त, महिलेला आठ वर्षांची मुलगी देखील होती, असे अधिकाऱ्याने सांगितले.
मुलांच्या परिस्थितीमुळे नैराश्य
" प्राथमिक माहितीनुसार असे दिसून आले आहे की, ही पीडित महिला तिच्या मुलांच्या परिस्थितीमुळे नैराश्याशी झुंज देत होती, ज्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे," असे पोलसांनी सांगितलं.
गुन्हा दाखल
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.