जेएनएन, मुंबई. गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात राईस मिलस् हे धान भरडण्याचं काम करतात. या राईस मिलस् मालकांना अडकवण्यासाठी त्यांना धमक्या देण्यात येत आहेत. त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी त्यांना धमक्या देऊन विधानपरिषदेत लक्षवेधी लावल्या जात आहेत, असा गंभीर आरोप भाजपा आमदार परिणय फुके यांनी केला आहे. 

राईस मिलस् मालकांना धमक्या 

विधान परिषदेत प्रश्न लावण्यासाठी काही पक्षाचे नेते हे त्यांच्या एजंटच्या माध्यमातून राईस मिलस् मालकांकडून पैशाचा व्यवहार करण्यासाठी धमक्या देत आहेत. तुम्ही आमच्या पक्षाचे काम करु नका, पैशासंबंधातील हा व्यवहाराबाबत बोलतानाच्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप त्यांच्याकडे असून त्यांनी त्याची एक प्रत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे, असं परिणय फुके यांनी सांगितलं. 

खंडणी मिळवण्यासाठी सभागृहात लक्षवेधी 

काही पक्षातील आमदार आणि त्यांचे सात ते आठ जवळचे कार्यकर्ते यात सहभागी असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. राईस मिलस् मालकांकडून खंडणी मिळवण्यासाठी सभागृहात लक्षवेधी लागली जात असल्याचाही आरोप परिणय फुके यांनी केला.

    मुख्यमंत्र्यांकडे सोपवली क्लिप

    या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी ॲाडीओ क्लिप मुख्यमंत्र्यांकडे सोपवली आहे, अशी खळबळजनक माहिती आमदार डॉ. परिणय फुके यांनी दिली. राजकीय नेत्यांचे एजंट राईस मिलस् मालकांना धमकावत असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑडिओ क्लिपची फॅारेंसीक चौकशी झाल्यानंतर पोलीस कारवाई करणार असल्याचं ही त्यांनी सांगितलं.

    हेही वाचा - Maharashtra Bhushan Award 2024: 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 लवकरच जाहीर करणार - देवेंद्र फडणवीस

    एजंटने केली पैशाची मागणी

    गडचिरोली जिल्ह्यात 100 ते 150 राईस मिल्स पैकी निवडक सात राईस मिल्सची नावे लक्षवेधीत घेण्यात आले. दोन दिवसांपूर्वी राईस मिल्स कार्यालयात येऊन एजंटने पैशाची मागणी करण्यात आल्याचा आरोप फुके यांनी केला.