जेएनएन, सोलापूर. Solapur Fire News: सोलापूर शहरात आगीची भीषण घटना घडली आहे. सोलापुरातील नई जिंदगी भागातील शांती नगरमध्ये प्लास्टिक कारखान्याला भीषण आग लागली आहे. या भीषण आगीमध्ये संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे.
संपूर्ण कारखाना जळून खाक
कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळल्यानंतर सोलापूर महापालिकेचे अग्नीशमन दल घटनास्थळी पोहोचले. कारखाना आगीपासून वाचवण्यासाठी अग्निशमक दलाने पूर्ण प्रयत्न केले, मात्र संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे.
हेही वाचा - Anna Bansode: विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी अण्णा बनसोडे यांचा अर्ज दाखल, बिनविरोध निवड होणार
कारखानदाराला मोठा आर्थिक फटका
आग सध्या पूर्णतः विझली असून,आगीचे कारण अस्पष्ट अद्याप समोर आले नाही. सुदैवानं या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही, मात्र कारखानदाराला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
हेही वाचा - IPL 2025 मध्ये बेटींग, पाकिस्तानी खेळाडूंशी संबंध म्हणत अंबादास दानवेंनी फोडला पेनडॉईव्ह बॉम्ब
दरम्यान, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ओझर्डे गावाजवळ काल एका बसला आग लागली होती. या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नसला तरी बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही तासांत आग आटोक्यात आणली. शिरगाव पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.