जेएनएन, मुंबई. Maharashtra Legislative Assembly Deputy Speaker Election: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी अण्णा बनसोडे यांनी अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी अण्णा बनसोडे यांनी अर्ज दाखल केला आहे.

बनसोडे यांच्या नावाची घोषणा 

नरहरी झिरवळ यांना मंत्री पदी वर्णी लागल्यानंतर अजित पवार गटाकडून बनसोडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. बनसोडे यांची निवड बिनविरोध होणार आहे, असे चित्र आहे.

हेही वाचा - Delhi Budget 2025: महिला समृद्धी योजनेपासून आयुष्मानपर्यंत, भाजप सरकारच्या पहिल्या बजेटमधील 10 महत्त्वाच्या गोष्टी

अण्णा बनसोडे यांची सरळ निवड 

भारतीय जनता पक्षाने अध्यक्ष पद घेतल्याने विधानसभा उपाध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देण्यात आले आहे. महायुतीकडे उपाध्यक्ष निवड करण्यासाठी पूर्ण बहुमत असल्याने अण्णा बनसोडे यांची निवड निश्चित झाली आहे.

    महाविकास आघाडीकडून उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला नाही. यामुळे अण्णा बनसोडे यांची निवड सरळ झाली आहे.