जेएनएन, पुणे. Mumbai-Pune Expressway Bus Fire: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ओझर्डे गावाजवळ एका बसला आग लागली. या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नसला तरी बस पूर्णपणे जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही तासांत आग आटोक्यात आणली. शिरगाव पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आगीची घटना
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ओझर्डे गावाजवळ झालेल्या या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाल्याचे दिसत आहे.
पुणे, महाराष्ट्र: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पर ओज़ार्डे गांव के पास एक बस में आग लग गई। हालांकि, कोई यात्री घायल नहीं हुआ, लेकिन बस पूरी तरह जलकर खाक हो गई। दमकलकर्मियों ने कुछ घंटों में आग पर काबू पा लिया। शिरगांव पुलिस मामले की जांच कर रही है pic.twitter.com/pfyVE0CirR
— IANS Hindi (@IANSKhabar) March 25, 2025
चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्रवाशांचे प्राण
मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर बस सुसाट असताना चालकाला बसला आग लागल्याचं लक्षात आलं. त्यानं त्वरीत बस रस्त्याच्या कडेला उभा करुन प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. पटपट सर्व प्रवाशी खाली उतरल्यानं मोठा अनर्थ टळला आहे.
हेही वाचा - Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांच्या खात्याचं 100 दिवसांचं रिपोर्ट कार्ड जाहीर, वीजदर कमी करण्याचा प्रस्ताव
अग्नीशमन दल दाखल
घटनेची माहिती मिळताच, अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. बसचे मोठे नुकसान झाले होते. बसपूर्णपणे आगीच्या भस्मस्थानी पडली होती. अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून बसचे कुलिंग करण्यात आले आहे. बसमधील प्रवाशांना इतर बसने रवाना केले आहे.