जेएनएन, मुंबई. Ambadas Danve on IPL 2025: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात पेनडॉईव्ह बॉम्ब फोडला आहे. मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत त्या संभाषणाचा पेनड्राइव्हच सभापतींकडे सादर केला.

पाकिस्तानी खेळाडूंचा यासाठी वापर 

बेटिंग करणाऱ्यांमध्ये मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन या व्यक्तींचा समावेश असून त्यांच्याकडून पाकिस्तानी खेळाडूंचा यासाठी वापर केला जात असल्याचा गंभीर आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉपी मध्ये लोटस 24 नावाच्या ऍपच्या माध्यमातून बेटिंग केल्यानंतर आता या सर्व व्यक्ती मुंबईत आयपीएल साठी आल्याची माहिती दानवे यांनी अंतिम आठवडावरील प्रस्तावावरील भाषणात सभागृहाला दिली. (Ambadas Danve Pendrive on IPL 2025 Betting:)

हेही वाचा - Maharashtra Education Policy: राज्यात नवीन शैक्षणिक धोरणातून आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्याचा संकल्प

अटल बिहारी वाजपेयी यांच्या काव्यपंक्ती सादर करत टीका

    तसंच, राज्याच्या परिवहन, सिडको, महसूल, आरोग्य विभागातील घोटाळे, मंत्र्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, अधिकाऱ्यांचे घोटाळे सादर करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारचे वाभाढे काढले. तसेच राज्यातील आर्थिक स्थिती रसातळाला जात असल्याचे म्हणत दानवे यांनी सरकारच्या कार्यपध्दतीवर निषेध व्यक्त केला.   

    छोटे मनसे कोही बडा नही हो सकता

    तुटे मनसे कोही खडा होई न सकता

    या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काव्यपंक्ती सादर करून दानवे यांनी सरकारच्या कारभारावर टिका केली.