जेएनएन, कोल्हापूर. शाहूकालीन राधानगरी धरणाच्या (Radhanagari Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे धरणाचे पाच दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत. धरणाच्या एकूण स्वयंचलित 7 दरवाजांपैकी 4 दरवाजे बंद झाले होते.आता पुन्हा 5 दरवाजे उघडले आहेत. सध्या एकूण 7140 क्युसेस इतका विसर्ग नदीपात्रात सुरु आहे.

8640 क्युसेकने विसर्ग सुरु

कोल्हापुरातील राधानगरी धरणाचे स्वयंचलित 5 द्वार पुन्हा उघडण्यात आले आहेत. सायंकाळी 5:35 वाजता द्वार क्र. 3, 4,5, 6 व 7 उघडली असून त्यांच्यामधून 7140 cusec व BOT पॉवर हाऊस मधून 1500 cusec असा एकूण 8640 cusec इतका विसर्ग नदी पात्रात सुरु आहे.

नदी काठच्या लोकांनी दक्षता घ्यावी

राधानगरी धरणाचे स्वयंचलित 5 द्वार पुन्हा उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदी पात्रातील विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अधिक पात्राबाहेरून वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या लोकांनी दक्षता घ्यावी, असं आवाहन केले आहे.

पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली

    राजाराम बंधारा येथील दुपारी 1 वाजताच्या आकडेवारीनुसार, पंचगंगा नदीने 40 फुटांची पाणीपातळी गाठली असून नदीची इशारा पातळी 39 फूट आहे. पंचगंगेची धोका पातळी ही 43 फूट इतकी असल्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने पूरग्रस्त भागात सतत नजर ठेवली आहे. नदीच्या काठावर शेती केलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.