जेएनएन, मुंबई. Maharashtra Rains Update: राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. तर अनेक नद्या इशारा पातळीवरुन वाहत आहेत. मुंबईतही मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईत काल एक मोनो रेल ही रुळावर अडकली होती. स्थानिक यंत्रणांनी रेस्क्यू ऑपरेशन करुन त्यामधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले आहे.
बृहन्मुंबई (मुंबई शहर व उपनगरे) क्षेत्रात मागील दोन दिवसांत अतिमुसळधार पाऊस कोसळला आहे. तसेच, बुधवार, दिनांक 20 ऑगस्ट 2025 च्या मध्यरात्रीपासून संततधार पाऊस सुरु आहे. सद्यपरिस्थितीत मुंबईतील जनजीवन सामान्य आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेसेवेसह 'बेस्ट' वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे.
मुंबई-पुण्यासह राज्यात सध्या पावसाची काय स्थिती आहे ते आपण या लाईव्ह अपडेटच्या माध्यमातून जाणून घेऊया….
- 2025-08-20 17:33:50
वर्धा नदीच्या पूर पातळीची जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
वर्धा नदीच्या पूर पातळीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली आहे. बामणी – राजुरा पूल व शिवनी चोर पूरग्रस्त भागाला भेट त्यांनी भेटी दिल्या. - 2025-08-20 17:13:43
कृषिमंत्र्यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी
राज्याचे कृषिमंत्री तथा वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी पूरग्रस्त भागाची तसंच नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. - 2025-08-20 16:31:02
गडचिरोलीत मुसळधार पाऊस; पुरामुळे भामरागड तालुक्यासह 112 गावांचा संपर्क तुटला
गडचिरोलीत मुसळधार पाऊस आणि पुरामुळे भामरागड तालुक्यासह 112 गावांचा संपर्क तुटल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी अंगणवाडी सेविका सीमा बांबोळे यांना हेलिकॉप्टरने वाचवले. तिला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.https://twitter.com/ians_india/status/1958117251527446907
- 2025-08-20 16:05:46
इगतपुरीत जोरदार पाऊस
इगतपुरी शहराच्या काही भागात पावसाने हजेरी लावली.https://twitter.com/ians_india/status/1958110355735122295
- 2025-08-20 15:36:39
खडकवासला धरणातून 39 हजार 138 क्यूसेकने विसर्ग वाढवला
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठानदी पात्रामध्ये सुरु असलेल्या विसर्गात सकाळी 10 वाजता 39 हजार 138 क्यूसेक इतकी वाढ करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये. खबरदारी घ्यावी- असं आवाहन मुठा कालवे पाटबंधारे उपविभागाचे अभियंता मोहन भदाणे यांनी केले आहे. - 2025-08-20 15:34:13
कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट
* ऑरेंज अलर्ट - पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट, * रेड अलर्ट - ठाणे, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, * येलो अलर्ट - सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ - 2025-08-20 13:59:24
मुरबाड येथील पूल वाहतुकीस बंद
मुरबाड येथील घोरले पूलावरून पाणी वाहत असून पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. वाहतुकीकरिता पर्यायी रस्ता उपलब्ध आहे. - 2025-08-20 13:54:43
Darna Dam: दारणा धरणातून 14496 क्युसेस विसर्ग
दारणा धरणातून आज 20 ऑगस्ट रोजी सुरू असलेला 10284 क्युसेस विसर्ग हा दुपारी 1.00 वाजता 4212 क्युसेस ने वाढ करून एकूण 14496 क्युसेस सोडण्यात येणार आहे. नदीलगतच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे - 2025-08-20 13:52:20
Mumbai Rains: 350 मिलीमीटर पावसाची नोंद
बृहन्मुंबई (मुंबई शहर व उपनगरे) क्षेत्रात मागील दोन - तीन दिवसात अतिमुसळधार पाऊस कोसळला. काही ठिकाणी कमी कालावधीत अभूतपूर्व म्हणजे 350 मिलीमीटरहून अधिक अतिमुसळधार पाऊस कोसळला.https://twitter.com/mybmc/status/1958078083065332032
- 2025-08-20 13:39:23
मुंबईत जनजीवन सुरळीत
बृहन्मुंबई (मुंबई शहर व उपनगरे) क्षेत्रात मागील दोन दिवसांत अतिमुसळधार पाऊस कोसळला आहे. तसेच, बुधवार, दिनांक 20 ऑगस्ट 2025 च्या मध्यरात्रीपासून संततधार पाऊस सुरु आहे. सद्यपरिस्थितीत मुंबईतील जनजीवन सामान्य आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेसेवेसह 'बेस्ट' वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे. - 2025-08-20 13:36:10
Mumbai Rains: मुंबईत वादळीवाऱ्यासह अतिजोरदार पाऊस
मुंबई शहर व उपनगरात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसासह अधूनमधून 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. भरती - सकाळी 10.14 वाजता - 4.02 मीटर ओहोटी - सायंकाळी 4.18 वाजता - 1.91 मीटर भरती - रात्री 10.03 वाजता - 3.44 मीटर ओहोटी - मध्यरात्रीनंतर 4.11 वाजता (उद्या, 21 ऑगस्ट 2025) 0.83 मीटर - 2025-08-20 13:31:44
नांदेड येथील पूरग्रस्तांना लष्कराकडून मदत
भारतीय लष्कराने नांदेड येथे सुरु असलेल्या पूरविषयक मदत कार्याची तीव्रता आणखी वाढवली. भारतीय लष्कराच्या तुकड्या पूरग्रस्त भागातील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात सक्रियतेने गुंतल्या आहेत.https://twitter.com/PIBMumbai/status/1958038236854444057
- 2025-08-20 13:03:42
Maharashtra Rains: महाराष्ट्रात पुरामुळे 21 जणांचा मृत्यू
* महाराष्ट्रात गेल्या चार दिवसांत मुसळधार पाऊस आणि पुरामुळे 21 जणांचा मृत्यू. * मुंबई, ठाणे, पालघर, कोकण आणि महाराष्ट्राच्या इतर भागात सलग पाऊस सुरूच. * पुरामुळे नांदेड जिल्ह्यात 8 नागरिकांचा मृत्यू * मुंबईत 300 मिमी पावसाची नोंद. Maharashtra Rains: राज्यात अतिमुसळधार पावसाने 21 जणांचा घेतला बळी, अनेक जण जखमी - 2025-08-20 12:59:01
मोनोरेलच्या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले...
मोनोरेलच्या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, "मोनोरेलच्या निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची संख्या असल्याने ही घटना घडली. तथापि, बचाव पथकांनी तात्काळ कारवाई केली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले... गरज पडल्यास पर्यायी व्यवस्था केली जाईल. सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा चोवीस तास काम करत आहेत..."https://twitter.com/ians_india/status/1958024697947328787
- 2025-08-20 12:38:52
नालासोपाऱ्यात दुकाने आणि रस्ते पाण्याखाली
नालासोपारा रेल्वे स्थानकाभोवती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दुकाने आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. - 2025-08-20 12:16:15
Mumbai Rains: मुंबईत वाहतूक सुरळीत
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. सध्या मुंबईत वाहतूक सुरळीत सुरु आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. ते आता सुरळीत झाले आहे. - 2025-08-19 19:25:31
Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पावसामुळे मोनो रेल अडकली
मुंबईत मुसळधार पावसामुळे म्हैसूर कॉलनी आणि भक्ती पार्क स्थानकांदरम्यान एलिव्हेटेड मोनो रेल अडकली. बचावकार्यासाठी क्रेनचा वापर सुरू करण्यात आला आहे.https://twitter.com/PTI_News/status/1957802810063606082
- 2025-08-19 16:35:31
Mumbai Rains: चुनाभट्टी रेल्वे स्थानकात भरले पाणी
मुसळधार पावसामुळे मुंबई आणि लगतच्या उपनगरांमध्ये अनेक भागात पाणी साचले आहे. चुनाभट्टी रेल्वे स्थानकावरही पाणी भरले आहे. संपूर्ण रेल्वे रुळ पाण्याखाली गेला आहे.https://twitter.com/PTI_News/status/1957756312911228991
- 2025-08-19 15:59:34
Mumbai Rains: सायन रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर साचले पाणी, लोकल ट्रेन सेवा विस्कळीत
मुंबई शहरात मुसळधार पाऊस सुरु आहे. सायन रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर पाणी साचले आहे आणि लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली आहे.https://twitter.com/PTI_News/status/1957747806418207187
- 2025-08-19 15:54:35
वीरधरण धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ
वीरधरण धरणातून दुपारी 4 वाजता नीरा नदीच्या पात्रात सुरू असलेल्या विसर्गात वाढ करुन 33 हजार 463 क्यूसेक इतका सुरु करण्यात येणार आहे. निरा नदीच्या दोन्ही तिरावरील सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी, असं आवाहन कार्यकारी अभियंता निरा उजवा कालवा विभाग फलटण यांनी केलं आहे. - 2025-08-19 15:24:01
Koyna Dam: कोयना धरणातून 80,500 क्युसेक विसर्ग
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 9 फुटांवरून 11 फुटापर्यंत उघडून 78,400 क्युसेक विसर्ग व पायथा विद्युतगृहातून 2100 असा एकूण 80,500 क्युसेक विसर्ग सुरु आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.https://twitter.com/InfoDivPune/status/1957740665640476812
- 2025-08-19 15:20:35
Mumbai News: राज्यातील परिस्थितीचा घेतला आढावा
आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाजन यांनी मुंबई शहर आणि परिसरासह राज्यातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी संपर्क साधून मुंबईतील माहिती जाणून घेतली. नांदेड व रायगड जिल्ह्यातील परिस्थितीविषयी संबधित जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून शासकीय यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याच्या त्यांनी सूचना दिले. - 2025-08-19 12:04:57
Mumbai Local News: हार्बर मार्गावरील लोकल सेवा स्थगित
रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यामुळे मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरील लोकल सेवा स्थगित केल्या; मुख्य मार्गावरील जलद सेवांनाही फटका बसला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. - 2025-08-19 12:01:46
Mumbai News: मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ, 350 नागरिकांचे स्थलांतर
मुंबईत अजूनही पाऊस सुरूच असून आज पहाटे 4 ते सकाळी 11 पर्यंत सरासरी 150 मिमी पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. उपनगरात हे प्रमाण अधिक आहे. मिठी नदीची उंची 3.9 मीटर इतकी वाढली असून कुर्ला क्रांतीनगर येथून 350 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने आढावा घेत असून महापालिका आयुक्त परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. - 2025-08-19 11:29:27
Mumbai Rains: मुंबईतील पावसाची सर्वाधिक नोंद झालेली ठिकाणे
पश्चिम उपनगरे - 1) चिंचोली अग्निशमन केंद्र - 361 2) कांदिवली अग्निशमन केंद्र - 337 3) दिंडोशी वसाहत महानगरपालिका शाळा -305 4) मागाठाणे बस आगार - 304 5) वेसावे उदंचन केंद्र - 240 शहर - 1) पर्जन्य जलवाहिन्या कार्यशाळा, दादर - 300 2) बी. नाडकर्णी महानगरपालिका शाळा, वडाळा - 282 3) फ्रॉसबेरी जलाशय, एफ दक्षिण विभाग - 265 4) प्रतीक्षा नगर महानगरपालिका शाळा, शीव - 252 5) सावित्रीबाई फुले महानगरपालिका शाळा, वरळी 250 पूर्व उपनगरे 1) चेंबूर अग्निशमन केंद्र - 297 2) इमारत प्रस्ताव कार्यालय, विक्रोळी - 293 3) पासपोली महानगरपालिका शाळा, पवई - 290 4) वीणा नगर महानगरपालिका शाळा - 288 5) टागोर नगर महानगरपालिका शाळा - 287 - 2025-08-19 11:15:14
Mumbai Rains: अजित पवारांनी घेतला राज्यातील परिस्थितीचा आढावा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थोड्या वेळापूर्वीच मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि मुंबई शहर आणि परिसर तसेच राज्यातील इतर भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना केल्या. - 2025-08-19 11:01:59
Maharashtra Rains: महाराष्ट्रात सहा जिल्ह्यात सुट्टी जाहीर
सहसंचालक, उच्च शिक्षण कोकण विभाग, पनवेलच्या अधिनस्त येणाऱ्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांना मंगळवार 19 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशाने तसे कळविण्यात आले आहे. - 2025-08-19 10:31:47
Mumbai Rains: मुंबईतील मुसळधार पावसामुळे सरकारी कार्यालये बंद
मुंबईतील मुसळधार पावसामुळे सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. तर खाजगी कंपन्यांनी घरून काम करण्याची परवानगी देण्याचे आवाहन BMC ने केले आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मुंबईतील सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालये मंगळवारी बंद राहतील, असे मुंबई महानगरपालिकेने सांगितले. - 2025-08-18 19:18:15
Washim Rains: वाशिममध्ये अतिवृष्टी
वाशिम जिल्ह्यातील सतत तीन दिवसापासून अतिवृष्टी सदृश्य पाऊस सुरू आहे. यामुळे रिसोड तालुक्यातील सरहद पिंपरी, आंचळ परिसरात यंदाच्या खरीप हंगामात चौथ्यांदा अनेक गावांना पुराच्या पाण्यानं वेढलं, तर मालेगाव तालुक्यातील जऊळका, अमानवाडी आदी भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. - 2025-08-18 18:50:15
Nanded Rains: नांदेडमध्ये पुरात 200 जनावरांचा मृत्यू - जिल्हाधिकारी
मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीबद्दल नांदेडचे डीएम राहुल कर्डिले यांनी माहिती दिली. यावेळी "... काही भागात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर आला आहे, ज्यामुळे अनेक गावे बाधित झाली आहेत आणि लोक अडकले आहेत. एसडीआरएफ पथकांसह बचाव कार्य सकाळपासून सुरू आहे. जरी पाऊस तात्पुरता थांबला आहे आणि पाण्याची पातळी कमी झाली आहे, आणि पुढील काही तासांत बचाव कार्य पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे, अंदाजे 150-200 गुरांचा मृत्यू झाला आहे. लातूर आणि बिदरसाठी पुढील पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये पाणी व्यवस्थापनाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. धरणाच्या पाण्याची पातळी प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी अधिकारी तेलंगणाच्या सिंचन अधिकाऱ्यांशी आणि लातूर आणि बिदरच्या जिल्हाधिकारी यांच्याशी सतत संपर्कात आहेत. जनतेला घरात राहून, सूचनांचे पालन करून आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आमची जलद कृती पोलिस पथक घटनास्थळी उपस्थित आहे... आम्ही बॉम्बे सॅपर्स आर्मी टीमलाही बोलावले आहे..." असं त्यांनी सांगिलतं. - 2025-08-18 18:13:34
Mumbai News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! विहार तलाव ओव्हरफ्लो
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी एक असलेला विहार तलाव आज (18 ऑगस्ट 2025) दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी भरुन ओसंडून वाहू लागला आहे. विहार तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता 2,769.8 कोटी लीटर (27,698 दशलक्ष लीटर) इतकी आहे.https://twitter.com/mybmc/status/1957410210609299531
- 2025-08-18 18:07:51
कोयना नदी पात्रात 21 हजार 300 क्युसेक विसर्ग; गावांना सतर्कतेचा इशारा
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज सायं 4 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फूट 6 इंचांवरून 3 फुटापर्यंत उघडले आहेत. त्यामुळे नदीमध्ये एकूण 21 हजार 300 क्युसेक विसर्ग सुरु आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. - 2025-08-18 17:47:31
बुलढाणा जिल्ह्यात अनेक नदी नाल्यांना पूर
बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. तर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झाल आहे. - 2025-08-18 17:25:54
Thane news: ठाण्यात अनेक भागात साचले पाणी
ठाणे शहरासह जिल्हाभर कालपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. जिल्हयातील शहापूर, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथसह सर्वच भागांमध्ये सखल भागात पावसाचं पाणी मोठया प्रमाणात साचले आहे. ठाण्यात 2 दिवस शाळा- महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. Maharashtra Rains: ठाण्यात सर्वदूर अतिमुसळधार पाऊस, 2 दिवस शाळा- महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर - 2025-08-18 16:18:03
Mumbai Rain Update: चेंबूरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद
मुंबई महानगर (मुंबई शहर आणि उपनगरे) क्षेत्रात आज (दिनांक 18 ऑगस्ट 2025) सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झालेली ठिकाणे... - 2025-08-18 16:14:54
Mumbai News: वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक मंदावली
सोमवारी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने विलेपार्लेजवळील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक मंदावली..
- 2025-08-18 16:12:34
Mumbai Rains: हिंदमाता परिसरात वाहतूक सुरळीत - बीएमसी
हिंदमाता परिसरातील पावसाचे पाणी उपसा करण्यासाठी हिंदमाता उदंचन केंद्र येथील सातही पंप कार्यान्वित आहेत. सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा वेगाने सुरु असून परिसरातील वाहतूक सुरळीत सुरू आहे, अशी माहिती बीएमसीच्या वतीने देण्यात आली आहे.https://twitter.com/mybmc/status/1957374697756057744
- 2025-08-18 16:10:11
Nanded Rains: लोकांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था केली - महाजन
"राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. काल दुपारपासून पाऊस पडत आहे. 5-6 जिल्ह्यांमध्ये पावसासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नांदेडमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे आणि पूरग्रस्त भागातून लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. एसडीआरएफ पथकांनाही बोलावण्यात आले आहे आणि प्रशासन त्यावर काम करत आहे... 4-5 लोक बेपत्ता आहेत, परंतु त्यांचा शोध सुरू आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. लोकांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे," अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.https://twitter.com/ANI/status/1957371451822293441
- 2025-08-18 15:45:57
120 लष्करी जवान बचाव कार्यासाठी रवाना
मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे बचाव कार्यासाठी भारतीय लष्कराने अहमदनगर आर्मी कॅम्पमधून एक टीम नांदेडमधील मुखेड तालुक्यात हलवली आहे. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरून 120 लष्करी जवान बचाव कार्यासाठी हलविण्यात आले आहेत, संरक्षण जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे. - 2025-08-18 15:39:16
मुंबईत मुसळधार पावसात झोपडपट्ट्यांवर भिंत कोसळली
मुसळधार पावसात एमएमआरडीएने बांधलेली संरक्षण भिंत कोसळली, ज्यामुळे पूर्व उपनगरातील सात झोपडपट्ट्यांचे नुकसान झाले, असे एका महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले. रविवारी संध्याकाळी चेंबूरच्या न्यू अशोक नगर परिसरात घडलेल्या या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही, असे त्यांनी सांगितले. - 2025-08-18 15:33:08
Nanded Cloudburst: मुखेडमध्ये ढगफुटी; सर्वत्र पाणीच पाणी Video
नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये ढगफुटीची (Mukhed Cloudburst) घटना घडली. एसडीआरएफच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत, तर छत्रपती संभाजी नगर येथून लष्कराची टीम बचाव कार्यासाठी रवाना करण्यात आली आहे.https://twitter.com/PTI_News/status/1957380979711950990
Nanded Rain : नांदेडमध्ये ढगफुटीसदृष्य पाऊस; 200 लोक अडकले, 5 जण दगावल्याची भीती, लष्कराला पाचारण - 2025-08-18 15:30:51
मुंबईत 6-8 तासांत 177 मिमी पाऊस; मुंबई लोकल सेवा प्रभावित - मुख्यमंत्री फडणवीस
Mumbai Rains: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सोमवारी मुंबईत 6-8 तासांत 177 मिमी पाऊस पडला आणि नागरिकांना सर्व खबरदारी घेण्यास सांगितले कारण दिवसभर भरती-ओहोटीसह आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील पाऊस आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, महानगरातील 14 ठिकाणी पाणी साचले आहे. उपनगरीय रेल्वे सेवा थोड्या उशिराने सुरू झाल्या आहेत परंतु त्या चांगल्या प्रकारे सुरू आहेत, तर इतक्या मुसळधार पावसातही मेट्रो रेल्वे सेवांवर कोणताही परिणाम झालेला नाही, असे फडणवीस म्हणाले.Mumbai local news[/caption]
- 2025-08-18 14:55:57
Mumbai News: मिठी नदीच्या पाणीपातळीत वाढ
जोरदार पावसामुळे मिठी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.पूरग्रस्त परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाकडून सतत पाळत ठेवली जात आहे. आपत्कालीन सेवांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. - 2025-08-18 14:45:48
Mumbai Waterlogging: सखल भागात पाण्याचे मोठे तलाव
मुंबईतील कुर्ला, सायन, दादर, अंधेरी, बांद्रा, ठाणे व नवी मुंबई परिसरात रस्त्यांवर पाण्याचे मोठे तलाव तयार झाले आहेत. लोकल ट्रेन ही उशिराने धावत असून रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी बससेवेलाही फटका बसला आहे. - 2025-08-18 14:35:01
Virar Rain Update: विरारमध्ये अनेक भागात पाणी साचले
विरारमध्ये सततच्या पावसामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.https://twitter.com/ians_india/status/1957358001771118959
- 2025-08-18 14:25:00
Mumbai Local News: लोकल गाड्या सुमारे 10 ते 2o मिनिटे उशिराने
लोकल गाड्या सुमारे 10 ते 2o मिनिटे उशिराने धावत आहेत. तथापि, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सेवा स्थगित करण्यात आल्या नाहीत. - 2025-08-18 14:15:31
Mumbai Rain Latest News: शेलारांनी घेतला कंट्रोल रूमचा आढावा
मंत्री आशिष शेलार बीएमसी कंट्रोल रूमला भेट दिली. यानंतर त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिली. "मी स्वतः बीएमसी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. आम्ही एक बैठकही घेतली आणि नोंदवलेल्या समस्यांवर आधारित आवश्यक सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, सकाळी शाळेत गेलेल्या मुलांना सुरक्षितपणे घरी परत पाठवण्यात आले. दुपारच्या शाळा आणि महाविद्यालयांना आता सुट्टी देण्यात आली आहे." असं ते म्हणाले.https://twitter.com/PTI_News/status/1957350297166369199
- 2025-08-18 13:56:53
Heavy Rains in Mumbai: पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुसळधार पावसामुळे वेस्टन एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे, ज्यामुळे प्रवासी भरपावसात अडकले आहेत.https://twitter.com/PTI_News/status/1957355484727705790
- 2025-08-18 13:53:46
Mumbai Rains News: माटुंगा भागात स्कुल बस पाण्यात अडकली, बसमध्ये अनेक विद्यार्थी
पावसाच्या पाण्याने भरलेल्या बसमध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना माटुंगा पोलिसांनी यशस्वीरित्या बाहेर काढले. मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि माटुंगा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. अधिकाऱ्यांनी पालकांना परिस्थितीची माहिती दिली आहे.https://twitter.com/ians_india/status/1957353164908155152
- 2025-08-18 13:50:10
Sindhudurg Rains: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक नद्यांना पूर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक भागात वाहतूक विस्कळीत झाली आहे.https://twitter.com/ians_india/status/1957354433290932343
- 2025-08-18 13:48:20
Mumbai Rains Update: प्रभादेवी परिसरात पाणी साचले
मुसळधार पावसानंतर हिंदमाता (प्रभादेवी) येथे पाणी साचले; रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन ठप्प झाले आहे.https://twitter.com/PTI_News/status/1957355492201664668
- 2025-08-18 13:47:04
Mumbai Rain Update: वीरा देसाई रोडवर पाणी साचले
मुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोडवर पाणी साचल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला समोर जावे लागत आहे.https://twitter.com/ANI/status/1957340638355009847
- 2025-08-18 13:45:01
Maharashtra Weather: या जिल्ह्यांत अलर्ट जाहीर
मुंबई, रायगड जिल्ह्याला आणि पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट तर, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. - 2025-08-18 13:43:53
Nanded Rains: 5 नागरिक बेपत्ता - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रावनगाव येथे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून, त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हसनाळ येथे 8 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. भासवाडी येथे 20 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. भिंगेली येथे 40 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. 5 नागरिक बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1957343009567367587
- 2025-08-18 13:42:01
Mumbai Latest News: मुंबईकरांनो घराबाहेर पडू नका - मुंबई पोलिस
सध्या मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट देण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. कृपया अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर पडू नका. प्रवास करावा लागल्यास काळजीपूर्वक नियोजन करूनच बाहेर पडा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. आमचे अधिकारी आणि कर्मचारी मदतीसाठी तत्पर आहेत. आपत्कालीन प्रसंगी 100/ 112 / 103 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. आपली सुरक्षितता आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे, असं पोलिसांनी आपल्या X वर म्हटलं आहे. सविस्तर वाचा Mumbai Rains: मुंबईकरांनो सावधान! पुढील 3 ते 4 तासांत…; घराबाहेर पडू नका – मुंबई पोलिसांचे आवाहन - 2025-08-18 13:38:54
Mumbai News: मुंबईत शाळांना सुट्टी
मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत (Heavy Rains in Mumbai) आहे. सततच्या पावसामुळे मुंबईतील दुसऱ्या सत्रातील अर्थात दुपारी 12 वाजेनंतर भरणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सोमवार, दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी सुटी जाहीर (Mumbai school holiday) केली आहे. सविस्तर वाचा - Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस सुरु, शाळा -महाविद्यालयांना सुट्टी जाहीर