जेएनएन, मुंबई: पुणेकरांसाठी आणि विदर्भातील नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या रविवारपासून पुणे–रीवा एक्सप्रेस (Pune Rewa Express) ही नवीन ट्रेन धावणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला जाणार आहे.

या नवीन ट्रेनमुळे पुणे आणि मध्य प्रदेशातील रीवा या शहरांदरम्यान थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच नागपूर आणि इतर मार्गावरील प्रवाशांना देखील मोठा फायदा होणार आहे. 

असे असतील स्टेशन! 

पुणे–रीवा एक्सप्रेसचे महत्वाचे स्टॉपेज पुढील प्रमाणे असतील:- 

  • पुणे
  • मनमाड
  • भुसावळ
  • नागपूर
  • जबलपूर
  • कटनी
  • सतना
  • रीवा

असा असणार वेळापत्रक!

  • ही ट्रेन दर रविवारी पुण्यातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रीवाला पोहोचेल.
  • परतीच्या दिशेने देखील दर सोमवारी रीवावरून सुटून पुण्यात पोहोचेल.
  • प्रवासाचा एकूण कालावधी अंदाजे 22 ते 24 तासांच्या दरम्यान असणार आहे.

हेह वाचा - Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनचे गिफ्ट! जुलै महिन्याचा हप्ता या दिवशी होणार खात्यात जमा