जेएनएन, मुंबई. लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana July Instalment) जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची लाभार्थी मोठ्या अतुरतेने वाट पाहत आहेत. आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी गूडन्यूज समोर आली आहे. जुलै महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थांच्या खात्यात जमा होणार आहे. कारण या योजनेंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या निधीचा शासन निर्णय जाहीर झाला आहे.
जुलै महिन्याचा हप्ता कधी पडणार? (when is deposit Ladki Bahin Yojana July installment)
महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणींच्या खात्यात लाभ जमा करण्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे. त्यानुसार यातून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी सुमारे 410.30 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी येत्या 10 दिवसांच्या आत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. त्यापूर्वी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहिण योजनेसाठी पात्र कोण आहे?
महिला आणि बाल कल्याण विभागाच्या माहिती नुसार,
- लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा,
- राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यांना लाभ मिळेल.
- लाभार्थ्यांचे किमान वय 21 वर्षे पूर्ण असावे तर कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत योजनेचा लाभ मिळेल.
- लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
या महिला लाडकी बहिण योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत
- ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. 2.50 लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
- सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु.1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/ उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
- ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
या नियमानुसार, योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही वरील नियमापैकी एकाही नियमात बसल असाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठराल.