जेएनएन, पुणे. GBS Cases In Maharashtra: गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) असलेल्या पुण्यातील 37 वर्षीय ड्रायव्हरचा पुण्यातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे या जीबीएस झालेल्या संशयित आणि पुष्टी झालेल्या मृत्यूंची संख्या सातवर पोहोचली आहे.
8 नवे रुग्ण आढळले
आठ नवीन संसर्गांची नोंद झाल्यानंतर संशयित जीबीएस रुग्णांची संख्या 192 वर पोहोचली आहे. पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या 167 आहे, तर 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चालक म्हणून करायचा काम
मृत व्यक्ती पुण्यात ड्रायव्हर म्हणून काम करत होता. खालच्या अंगांमध्ये कमकुवतपणा जाणवल्या मुळे त्याला सुरुवातीला शहरातील रुग्णालयात आणण्यात आले होते, असे पुणे नागरी आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.
हेही वाचा - Maharashtra Board Exam 2025: राज्यात उद्यापासून 12वी आणि 'या' तारखेपासून 10वीच्या परीक्षा सुरू!
सांगलीत जीबीएसचा उपचार
त्याच्या नातेवाईकांनी त्याला पुण्यातील रुग्णालयात दाखल केले नाही आणि 1 फेब्रुवारी रोजी कर्नाटकातील निपाणी येथे नेले. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला सांगली येथील रुग्णालयात दाखल केले जिथे त्याला जीबीएसचा उपचार म्हणून आयव्हीआयजी (इंट्राव्हेनस इम्युनोग्लोबुलिन) इंजेक्शन देण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
डिस्चार्ज घेतला
"5 फेब्रुवारी रोजी, रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय सल्ल्याविरुद्ध (सांगलीहून) डिस्चार्ज घेतला आणि त्याच दिवशी त्याला पुणे महानगरपालिका संचालित कमला नेहरू रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा - Maharashtra Politics: पालकमंत्री पदाचा तिढा सुटेना, रस्सीखेच सुरूच! डीपीडीसीची बैठक पुढे ढकलली
हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
रुग्णाला उपचारादरम्यान सुप्रा-व्हेंट्रिक्युलर टाकीकार्डिया, हृदयाच्या लयीचा विकार झाला. आणि त्यानंतर 9 फेब्रुवारी रोजी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
167 रुग्णांना जीबीएसचं निदान
अधिकाऱ्यांच्या मते, 192 संशयित रुग्णांपैकी 167 रुग्णांना जीबीएस असल्याचे निदान झाले. 192 रुग्णांपैकी 39 रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रातील, 91 रुग्ण नागरी क्षेत्रातील, 29 रुग्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील, 25 रुग्ण पुणे ग्रामीण क्षेत्रातील आणि आठ इतर जिल्ह्यांतील आहेत.
91 रुग्णांना डिस्चार्ज
राज्य आरोग्य विभागाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या प्रकरणांपैकी 91 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जीबीएस होण्याची प्रमुख कारणे -
- बॅक्टेरिअर इन्फेक्शन
- व्हायरल इन्फेक्शन
- रोगप्रतिकारशक्ती कमी होणे
- दूषित पाणी
अशी आहेत जीबीएसची प्रमुख लक्षण
- शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होने
- हात, पायात मुंग्या येणे
- अशक्तपणा जाणवू लागणे.
- बोलण्यास आणि जेवन करण्यास त्रास होने.
- स्नायु कमकुवत होने.
- दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होने आदी प्रमुख लक्षणे आहेत.