जेएनएन, मुंबई. Maharashtra Politics News: नाशिक आणि रायगड जिल्हाचा पालकमंत्री पदाचा वाद अजूनही सुटला नाही. पालकमंत्री वादावरुन नाशिक आणि रायगड जिल्हाचा अर्थसंकल्प आधीची नियोजन विभागाची बैठक पुढे ढकलली आहे.
पालकमंत्री पदावर दावा
अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणारी बैठक पालकमंत्री वादावरून पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटांकडून पालकमंत्री पदावर दावा केला आहे.
नाशिक आणि रायगड जिल्ह्याची बैठक पुढे ढकलली
महाराष्ट्र राज्याचा आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवारांनी जिल्हानिहाय आढावा बैठक सुरू केली आहे. राज्यातील जवळपास जिल्ह्याची बैठक संपली असून नाशिक आणि रायगड जिल्ह्याची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
शेवटच्या दिवशी बैठका
वादग्रस्त जिल्ह्यांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसीठीच्या बैठका शेवटच्या दिवशी घेण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेलता आहे. काल कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याची बैठक पार पडली. मात्र नाशिक आणि रायगडची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
हेही वाचा - Maharashtra Board Exam 2025: राज्यात उद्यापासून 12वी आणि 'या' तारखेपासून 10वीच्या परीक्षा सुरू!
आज या ठिकाणी DPDC बैठक
आज नाशिक आणि रायगड जिल्ह्याची बैठक पार पडण्याची शक्यता आहे. काल उत्तर महाराष्ट्रसह इतर जिल्ह्यांच्या बैठका पार पडले आहे. तर नाशिक आणि रायगड जिल्ह्याची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आज रायगड, नाशिक, मुंबई, ठाणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांच्या बैठक पार पडण्याची शक्यता आहे.
शिंदे पवार गट आमने-सामने!
महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदाची वाटाघाटी पासूनच एकनाथ शिंदे शिवसेना गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात वाद सुरू आहे. पालकमंत्री वाटाघाटीचा निर्णय झाल्यानंतरच लगेच 24 तासात रायगड आणि नाशिक जिल्हाचा पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदावर भाजप आमदार आणि मंत्री गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावर महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधानंतर हे दोन्ही निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे घेलते आहे.