जेएनएन, तुळजापूर: महाराष्ट्रातील तुळजापूरमधील प्रसिद्ध मंदिर तुळजाभवानी मंदिराच्या गर्भ गाभाऱ्याला तडे गेल्याची माहिती समोर आली आहे. भवानी मातेच्या मंदिराच्या गर्भ गाभाऱ्याला तडे गेल्याने परिसरात चिंतेच वातावरण आहे. 

तुळजाभवानीच्या मूर्तीला

कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिराच्या गर्भ गाभाऱ्याच्या तडे गेल्याने तुळजाभवानीची मूर्ती, गर्भ गाभारा व मंदिराच्या शिखराला धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती स्थानिक पुजारीने दिली आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आई भवानीच्या मंदिराचे स्ट्रक्चर ऑडिट व पाहणी करून तात्काळ दुरुस्ती करावी असे निवेदन स्थानिक पुजारी मंडळांने मंदिर संस्थानचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी सचिन ओंबाशे यांना दिले आहे. निवेदनात मंदिराच्या गर्भ गाभाऱ्याची पाहणी करून तात्काळ दुरुस्ती काम सुरू करावे अशी विनंती करण्यात आले आहे.

    5000 नागरिक व पुजारीने केली सही 

    निवेदनात स्थानिक पुजारी मंडळ मंदिरकडून 5000 नागरिक व पुजारीने सही केली आहे. स्थानिक पुजारी मंडळाच्या वतीने आई तुळजाभवानीच्या मूर्ती रक्षणासाठी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत पाच हजार सह्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

    गर्भ गाभाऱ्याच्या शिळाना तडे जाण्याची घटना गंभीर 

    तुळजाभवानी मंदिराचा मूळ गर्भ गाभारा काढून त्या ठिकाणी प्रशस्त मोठा गाभारा निर्माण करावा अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिराच्या गर्भ गाभाऱ्याच्या शिळाना तडे जाण्याची घटना गंभीर आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची सूचनाही स्थानिक पुजारी मंडळांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना केली आहे.

    जिल्हाधिकारी करणार पाहणी

    स्थानिक पुजारी यांच्या निवेदनानुसार, जिल्हाधिकारी सचिन ओंबाशे लवकरच तुळजाभवानी मंदिराच्या गर्भ गाभाऱ्याला तडे गेलेल्या भागाची पाहणी करणार आहेत. पाहणी केल्यानंतर दुरुस्ती आणि ऑडिटचे काम सुरू केले जाणार आहे.