जेएनएन, पुणे. Pune News: पुण्यातील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील धनकवडी भागातील आयुर्वेदिक केंद्रावर काही टोळक्यांनी एका महिलेला ब्लॅकमेलिंग करुन खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. टोळक्यांनी मसाज घेण्याच्या नावाखाली महिलेला कपडे काढायला लावले आणि त्याचा व्हिडिओ काढला तो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून खंडणी मागितली आहे.
महिलेला अंगावरील टॉप काढायला लावला
पुण्यातील धनकवडी भागातील आयुर्वेदिक केंद्रावर मागील काही दिवसांपूर्वी एक टोळक्यांची गँग आली होती. त्यांनी तेथील महिलेला एक तास उपचार घ्यायचे आहेत असे सांगून महिलेला अंगावरील टॉप काढायला लावला आणि महिलेला काही कळण्याच्या आतच त्यांनी तिचा व्हिडिओ काढला, अशी माहिती डीसीपी स्मार्तना पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा - Thane Fire News: कल्याणमधील रिव्हरडेल इमारतीला आग, दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण
केंद्र बंद करण्याची धमकी
मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. तू मी जसे सांगेल तसे केले नाहीस तर केंद्र बंद करेल अशी धमकी दिली. त्यानंतर जबरदस्तीने दोन ते तीन इसम आत मध्ये आले. आणि व्हिडिओ काढला असल्याची माहिती दिली व 20 हजार रुपये खंडणी मागितली, असं महिलेनं सांगितलं, असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. याप्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - Shaktipeeth Highway: नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाला विरोध, संघर्ष समितीचा मंत्रालयावर धडक मोर्चा!
सात ठिकाणी अशाच केला गुन्हा
याप्रकरणी विविध कलमांतर्गत आरोपी रोहित वाघमारे, शुभम धनवटे, राहुल वाघमारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरातील सात ते आठ ठिकाणी अशाच प्रकारचा गुन्हा केल्या असल्याची आरोपींची कबुली दिली आहे, असं पोलिसांनी सांगितलं.