जेएनएन, मुंबई. Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे रोहित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात विधानसभेत आज प्रश्न उपस्थित केले. यावर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तरे दिली.

“निवडणुकीपूर्वी योजना जाहीर केली तेव्हा किती लाभार्थी होते? निवडणुकीनंतर सगळे निकष लावले गेले, त्यामुळे नेमक्या किती लाभार्थी महिलांना अपात्र केलं गेलं? आणि सरकारनं सांगितल्याप्रमाणे महिलांना 2100 रुपये देणार आहात की नाहीत?” असे प्रश्न वरुण सरदेसाईंनी सभागृहात प्रश्न विचारले.

लाडक्या बहिणींची संख्या वाढली

त्यावर, मंत्री अदिती तटकरे यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी  विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी, म्हणजेच ऑक्टोबर 2024 मध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सुमारे 2 कोटी 33 लाख 64 हजार इतकी होती. विधानसभा निवडणुकीनंतर, म्हणजेच फेब्रुवारी 2025 मध्ये या लाभार्थ्यांची संख्या सुमारे 2 कोटी 47 लाख झाली आहे. म्हणजेच लाभार्थ्यांच्या संख्येत निवडणुकीनंतर जवळपास 14 लाखांची वाढ झाली आहे अशी माहिती तटकरे यांनी दिली.

हेही वाचा - राज्यात अनधिकृत भोंगे हटवले जातील, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार

2100 रुपयांसंदर्भात योग्य वेळी निर्णय

    माझ्या लाडक्या बहिणींचा हा प्रतिसाद "निवडणुकीनंतर योजना बंद पडणार, निवडणुकीनंतर लाभार्थ्यांची संख्या कमी होणार" या विरोधकांच्या अपप्रचाराला सडेतोड उत्तर देणारा आहे. तसंच, महिलांना 1500 रुपयांचा लाभ देणारं महायुतीचं एकमेव सरकार आहे. महिलांना हा लाभ कायम मिळत राहणार आहे. 2100 रुपयांसंदर्भात आमचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून योग्य वेळी निर्णय घेतील. पण लाडक्या बहि‍णींची फसवणूक होणार नाही”, असं आदिती तटकरे म्हणाल्या.